द पॉईंट नाऊ ; जगभरासह आता भारतात देखील कोरोनाचा ओमीक्रॉन हा प्रकार आपले पाय पसरू लागला आहे.
कर्नाटक मध्ये दोन ओमीक्रॉन चे रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्रात डोंबिवली येथे ओमीक्रॉनचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर महाराष्ट्रात पिंपरी चिंचवड येथे सहा आणि पुणे येथे एक रुग्ण आढळला.
आता राजस्थानमध्ये ओमीक्रॉनचे तब्बल नऊ रुग्ण आढळले आहेत. यामुळे भारतात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
ओमीक्रॉनने आता भारतात आपले पाय पसरवायला सुरुवात केली आहे. भारतात आता ओमीक्रॉनचे 21 रुग्ण झाले आहेत.
जगभरात ओमीक्रॉनने धुमाकूळ घातला असतांना, भारतात चिंतेचे वातावरण नाही, म्हणून प्रशासन सांगत होते. परंतु, आता भारतात एका रुग्णाच्या शोधा नंतर ही संख्या अजून वाढत चालली आहे. भारतात ओमीक्रॉन च्या वाढत्या आलेखाने चिंतेचे वातावरण पसरले आहे.
परदेशातुन भारतात परतलेल्या नागरिकांद्वारेच हा नवा व्हॅरिएंट आता आपले हातपाय पसरू लागला आहे. या नव्या व्हॅरिएंट ने आता शासनाला देखील चिंतेत टाकले आहे. एका मागे एक ओमीक्रॉनची रुग्णसंख्या वाढू लागल्याने, नागरिकांनी आता सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा व्हॅरिएंट कितपत घातक आहे, हे जरी अद्याप पूर्णपणे स्पष्ट नसले, तरी त्याचा वेग मात्र आता दिसून येऊ लागला आहे.
भारतात आधीच्या कोरोनाच्या दोन लाटांनी सारे काही अस्ताव्यस्त केले होते. त्यानंतर आता परिस्थिती पूर्वपदावर येत असताना, शाळा, महाविद्यालये, मंदिरे, सिनेमागृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या परवानग्या देण्यात आल्या होत्या.
परंतु आता हा नवा व्हॅरिएंट आपला रंग दाखवू लागल्याने, परिस्थिती बाबत भीती व्यक्त केली जात आहे. अशाच प्रकारे हा नवा प्रकार आपले हात पाय पसरू लागला, तर पुन्हा निर्बंधांबाबत विचार केला जाऊ शकतो. असा अंदाज बांधला जाऊ लागला आहे.
भारतात 120 कोटींहून अधिकचे लसीकरण झाले आहे. आता बूस्टर डोस बाबत देखील सांगितले जात आहे. कोरोनवरील या लसींनी त्यास अटकाव केला आहे खरा. मात्र कोरोनाचे असेच एका मागे एक नवनवे व्हॅरिएंट समोर येऊ लागले, तर परिस्थिती बिघडू शकते की काय? अशी चर्चा होऊ लागली आहे.
तर भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत आधी बोलले जात होते. त्यामुळे ही तिसरी लाट तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. म्हणून आता या नव्या व्हॅरिएंट ला शासन कशा पद्धतीने सामोरे जाते? त्याबाबत काय निर्णय घेतला जातो? हे पाहणे महत्वाचे आहे. तर त्याचबरोबर नागरिकांनी देखील आता आपल्या स्तरावर काळजी घेणे आवश्यक आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम