नाशिक ब्रेकिंग-
नाशिक प्रतिनिधी :
कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांना कोणी वाली नसल्याची परिस्थिती आहे. आज पुन्हा भाजीपाल्याचे भाव घसरल्याने शेतकरी संतप्त झाले असून शेतकऱ्यांनी शेतमाल लिलावावर बहिष्कार टाकला , तर दुसरीकडे शेतमाल रस्त्यावर फेकला आहे.
टोमॅटो, कोबी,दोडके, मेथी, पालक, भोपळा, कारल्यासह काकडीही शेतकऱ्यांना रडवत आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीत भाजीपाला फेकला आहे. काकडीला 1 रुपये किलोचा कवडीमोल भाव मिळाला तर 15 किलोची दोडक्याची जाळीला अवघ्या 50 रुपयांचा भाव
भोपळा, पालक आणि कारल्यालाही भाव नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
अशा परिस्थितीत मुळे शेतकऱ्यांचे उत्पादन आणि वाहतूक खर्चही वसूल होत नसल्यानं शेतकरी संतप्त झाले आहेत
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम