भाजप नेत्यांनी भारताची अब्रू काढली ; चीनला आयते कोलीत

0
129

किर्ती आरोटे
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; चीनने भारत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरमधील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी केली. उत्तर प्रदेशातील हे एकूण नववे आणि पाचवे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल असा दावा भाजपचे नेते करत आहेत.

उत्तर प्रदेश हे देशातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले राज्य आहे. भाजप नेत्यांनी यासंदर्भात काही छायाचित्रे प्रसिद्ध केले आहेत. या माध्यमातून अनेकांना रोजगार संधी प्राप्त होतील असाही दावा केला जातो आहे. मात्र आता चीनच्या शेन शीवई यांनी एक पोस्ट केली आहे त्यात ते म्हटल आहे की भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या पायाभूत सुविधांच्या उपलब्धीचा पुरावा म्हणून चीन बीजिंग डॅक्सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळाची छायाचित्रे वापरावी लागली हे जाणून धक्का बसला.

यावर अजूनही कोणत्याही भाजप नेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाही. शेन शीवई हे चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्क चे एडिटर आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी हे छायाचित्र पोस्ट केले. भाजप नेत्यांच्या या कामगिरीचा माजी क्रिकेटपटू किर्ती आजद यांनीही खरपूस समाचार घेत पोस्ट केलीय ज्यात त्यांनी म्हटलंय काय लाजिरवाने आहे या भाजप मंत्र्यांना किती कमीं ज्ञान आणि अक्कल आहे हे सर्वांना माहित आहे. आणि त्यात भारतीय सरकारी अधिकृत टि्वटर खात्यानेही हेच पोस्ट केलय.

नोएडा येथे असलेल्या जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. हा विमानतळ सप्टेंबर २०२४ पासून सुरू करण्याचे लक्ष्य डोळ्यांपुढे ठेवण्यात आले आहे. विमानतळाची निर्मिती ज्यूरिख एयरपोर्ट इंटरनॅशनल ही कंपनी करणार आहे. जेवर विमानतळाच्या निर्मितीसाठी २९ हजार ६५० कोटी रुपयांचा खर्च करण्याची तरतूद केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here