भाजप आमदाराविरोधात टिप्पणी केल्याने, पोलिसांनी पत्रकारांना केले अर्धनग्न

0
29

द पॉईंट नाऊ ब्युरो : पत्रकार हा समाजातील घडणाऱ्या सकारात्मक-नकारात्मक बाबींना वाचा फोडत असतो. पत्रकार हा निर्धास्तपणे अन्यायावर आपले मत मांडतो. मात्र मध्य प्रदेशात सिधी जिल्ह्यात एका आमदारा विरोधात टिप्पणी करणे पत्रकारांसह एका युट्युबरला महागात पडले. इथे आमदारा विरोधात टिप्पणी केल्याने पोलिसांनी पत्रकारांसह युट्युबरला अर्धनग्न केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.

भाजप आमदार केदार शुक्ला आणि त्याचा मुलगा गुरुदत्त याच्या विरोधात अपमानजनक टिप्पणी केल्याच्या आरोपाखाली कोतवाली पोलिसांनी अटक केली. या अटकेविरोधात पत्रकारांसह कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आपला विरोध दर्शवला. यामुळे पोलिसांनी त्यांनाही अटक करून, अर्धनग्न केले.

या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. भारतात आपले मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार मिळालेला आहे. मात्र मध्य प्रदेशात आपले मत मांडल्याच्या कारणातून पोलिसांनी पत्रकारांना अर्धनग्न केले. यामुळे संरक्षण करणारे पोलिसच असे वागल्याने संताप व्यक्त केला जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here