देवळा प्रतिनिधी : वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे तसेच सर्व समस्या तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन वीजवितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता रामसिंग राठोड यांनी सोमवारी ( १४) रोजी दिले .
तालुक्यात वारंवार खंडित होणार वीज पुरवठा ,वेळेत ट्रान्सफार्मर न मिळणे , ठेंगोडा येथिल स्टोररूमचे स्थलांतर आदी समस्यांचे निराकरण करण्यासाठी आज सोमवारी ( १४) रोजी भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या उपस्थितीत देवळा येथील वीज वितरण कंपीनीच्या उपविभागीय कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती . यावेळी तालुक्यातील वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
देवळा तालुक्यातील शेतकरी ,व्यावसायिकांना गेल्या अनेक दिवसांपासून वीज समस्या भेडसावत आहे . वीज बिल भरून देखील डीपी मिळत नाही , कमी दाबाने वीज पुरवठा , विस्कळीत सेवा यानेग्राहक वर्ग वैतागला आहे . हि समस्या मार्गी लावण्यासाठी भाजपचे जिल्हा अध्यक्ष केदा आहेर यांनी सोमवारी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत शेतकऱ्यांची बैठक घेऊन समस्या जाणून घेऊन मार्गी लावण्याचे काम केल्याने शेतकऱ्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले . विजेअभावी शेतकऱ्यांना कांदा तसेच रब्बी पिकांना वेळेत पाणी देता येत नसल्याने पिके करपू लागली आहेत .यामुळे वीज वितरण कंपनीवर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे .
यावेळी माजी सरपंच भाऊसाहेब पगार ,उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर ,बाजार समितीचे माजी सभापती अशोक आहेर माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार , तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण , किशोर आहेर .कार्यकारी अभियंता रामसिंग राठोड, उपकार्यकारी अभियंता बंकट सुरवसे , घनश्याम गायधनी , सहायक अभियंता जितेंद्र देवरे,रवींद्र खाडे ,कुंभार आदींसह शेतकरी , ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम