भाजपा इ.मागासवर्गीय जिल्हा सरचिटणीस पदी सोनजे

0
36

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; भारतीय जनता पक्षाच्या इतर मागासवर्गीय विभागाच्या जिल्हा सरचिटणीस पदी पिंपळगाव ( वा. ) येथील समाधान सोनजे यांची निवड करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संजय शेवाळे यांनी दिली.

सोनजे हे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे क्रियाशील सदस्य म्हणून काम करत असून पक्षाने निवडणूक काळात त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या दिलेल्या होत्या. उत्कृष्ट संघटन कौशल्य असल्याने त्यांची जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांच्या निवडीबद्दल केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, आ. राहुल आहेर, आ. देवयानी फरांदे, आ. राहुल ढिकले, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, प्रदेश सरचिटणीस शंकरराव वाघ यांनी विशेष अभिनंदन केले आहे. यावेळी दत्तू साबळे, दिनेश वनसे, एकनाथ बढे, भाऊसाहेब साबळे, मच्छिंद्र खैरनार, दिनेश खैरणार, योगेश सोनवणे, समाधान सोनजे, सोपान खैरणार, मागू परदेशी, निंबा खैरणार, रविंद्र बागुल, लाला वाघ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here