द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी तालुक्यातील वरवंडी ता देवळा येथील प्रकाश बच्छाव यांची नियुक्ती करण्यात आली.
नाशिक येथील ‘वसंतस्मृती’ या भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीत भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब डोंगरे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. त्यांच्या नियुक्तीचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हाध्यक्ष केदा नाना आहेर, तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, अनुसूचित जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष विष्णू शेवाळे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दिशांत देवरे, जितेंद्र आहेर, अतुल पवार, अंबादास मांडवडे, भाऊसाहेब आहेर, भास्कर पवार, विजय आहेर, दीपक जाधव, वैजिनाथ देवरे आदींनी अभिनंदन केले.
Edit Bye- Somnath Jagtap
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम