देवळा प्रतिनिधी : येथील माजी सरपंच रघु नवरे यांनी आज( दि १७)रोजी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला .देवळा नगरपंचायतीच्या येन निवडणुकीच्या रणधुमाळीत नवरे यांची घरवापसी झाल्याने राजकीय तर्क वितर्काना उधाण आले आहे .
देवळा येथील वायबीएस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष , राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष व माजी सरपंच रघु संभाजी नवरे यांनी गेल्या वर्षी डिसेंबर २०२० मध्ये चांदवड येथे केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार ,आमदार डॉ राहुल आहेर , जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी भाजपात प्रवेश केला होता . नवरे यांच्या सुविद्य पत्नी बेबी नवरे ह्या विद्यमान नगरसेविका आहेत .रघु नवरे हे होऊ घातलेल्या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत इच्छुक उमेदवार होते . तशी त्यांनी तयारीही केली होती . उमेदवार अर्ज देखील दाखल केला होता . मात्र ,त्यांना डावलण्यात आल्याने त्यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली .
गुरुवारी (दि १७) रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या नारळ वाढविण्याचा कार्यक्रमात रघु नवरे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन पक्ष निरीक्षक व जि प चे उपाध्यक्ष डॉ सयाजीराव गायकवाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करून घरवापसी केली . येन निवडणुकीच्या रणधुमाळीत नवरे यांच्या घरवापसीने राजकीय वर्तुळात तर्क वितर्काना उधाण आले आहे . एकलव्य भिल्ल सेनेच्या माध्यमातून रघु नवरे यांनी तालुक्यात खेडोपाडी कार्यकर्यांचे जाळे निर्माण केले आहे . यावेळी निरीक्षक डॉ सायजीराव गायकवाड ,तालुका अध्यक्ष यशवंत शिरसाठ, पंडितराव निकम ,डॉ विश्राम निकम ,योगेश आहेर , माजी सभापती उषाताई बच्छाव ,युवक तालुका अध्यक्ष सुनील आहेर, शहर अध्यक्ष दिलीप पाटील ,जिल्हा सरचिटणीस जगदीश पवार, लक्ष्मीकांत आहेर , सचिन सूर्यवंशी आदी उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम