मुंबई प्रतिनिधी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीसाठी राव हे मुंबईत आले असून. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी उद्धव ठाकरे तसेच चंद्रशेखर राव यांच्यात चर्चा होत आहे.
बैठकीच्या सुरवातीला चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचे पुत्र तेजस ठाकरे यांच्याशी चाय पे चर्चा केली. आता बैठकीला सुरुवात झाली असून. बिगर भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र करण्याचा चंद्रशेखर राव यांचा प्रयत्न असल्याने सर्वांचेच या भेटीकडे लक्ष लागून आहे. भाजपाचे देखील या भेटीकडे लक्ष असून नेमकं काय घडामोडी घडता याकडे लक्ष लागून आहे.
मुख्यमंत्र्यांची बैठक संपल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेणार आहे. या भेटीकडे सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम