भाजपाच्या बालेकिल्ल्यात सेनेचे ‘शिवसंपर्क अभियान’ ; 19 खासदारांची फौज मैदानात

0
6

मुंबई प्रतिनिधी : राज्यात भाजपा शिवसेना कलहात अनेक दावे प्रतिदावे केले जात असून, इतर राज्यातील निवडणुकांनी भाजपच्या अंगात ताकत आली असून भाजपच्या आत्मविश्वासाला रोखण्यासाठी शिवसेनेने भाजपच्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत करण्याचं ठरवलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी खासदार व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना याबाबतचे संकेत दिले असून प्रत्येक मतदारसंघाची सविस्तर माहिती मागवली आहे. तसेच शिव संपर्क अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला जाणार असल्याची माहिती दिली आहे. सुरूवातीला भाजपचा (BJP) बालेकिल्ला असलेल्या विदर्भ व मराठवाड्यावर लक्ष केंद्रित करण्यात आल्याने नेमकं सेनेला किती फायदा होणार याकडे लक्ष लागून आहे.

राज्यात सेनेचे शिव संपर्क अभियान 22 ते 25 मार्चदरम्यान असून प्रत्येक खासदारावर एका जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या खासदारांच्या टीममध्ये संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरची जबाबदारी देण्यात आली तर राज्यसभेतील खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांच्या खांद्यावर भंडारा जिल्ह्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

शिवसैनिकांना ताकद देण्यासाठी या शिव संपर्क अभियानाच्या माध्यमातून मदत होणार आहे तसेच, शिवसेनेचे विचार तळागाळात पोहचवण्याचे आवाहन ठाकरे यांनी खासदार व पदाधिकाऱ्यांना केले आहे. आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधताना ठाकरे यांनी भाजपवरही हल्लाबोल केला. भाजपला टक्कर देण्यासाठी त्यांनी भाजपची ताकद असलेल्या मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले आहे. तिथं नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याबाबतही ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यामुळे शिव संपर्क अभिनायतही भाजप विरूध्द शिवसेना असाच सामना पाहायला मिळणार असल्याचे संकेत आहेत.

खासदारांना देण्यात आलेली जबाबदारी

पूर्व विदर्भ –
1. नागपूर – खासदार संजय राऊत
2. चंद्रपुर – खासदार हेमंत गोडसे
3. गडचिरोली – खासदार राहुल शेवाळे, सुधीर मोरे
4. भंडारा – खासदार प्रियंका चतुर्वेदी
5. गोंदिया – खासदार राजन विचारे
पश्चिम विदर्भ
6. अमरावती – खासदार गजानन कीर्तिकर
7. यवतमाळ – खासदार अरविंद सावंत
8. बुलढाणा – खासदार संजय जाधव
9. अकोला – खासदार हेमंत पाटील
10. वाशिम – खासदार प्रतापराव जाधव
11. वर्धा – खासदार कृपाल तुमाने

मराठवाडा
12. संभाजीनगर (शहर ) – खासदार विनायक राऊत
13. संभाजीनगर (ग्रामीण) – लक्ष्मण वडले, शिवसेना उपनेते
14. नांदेड – खासदार अनिल देसाई
15. परभणी – खासदार श्रीकांत शिंदे
16.. धाराशिव – खासदार सदाशिव लोखंडे
17. जालना – खासदार श्रीरंग बारणे
18. बीड – खासदार ओमराजे निंबाळकर
19. लातूर – खासदार धैर्यशील माने
20. हिंगोली – खासदार संजय मंडलिक


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here