मुंबई प्रतिनिधी : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात असून खासदार संजय राऊत यांनी सांगितलेले साडे तीन भाजपाचे नेते कोण हे जाहीर होण्याची शक्यता असल्याने, आज सायंकाळी शिवसेना भवनात पत्रकार परिषद ही वादळी होणार असल्याने. या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिवसेना आणि भाजप यांच्यातील संभाव्य राजकीय संघर्षाचा पुढील अंक आज रंगण्याची चिन्हं आहेत. शिवसेनेच्या वतीने आज दणक्यात दादर येथील शिवसेना भवनात पत्रकार परिषद होणार आहे. भाजपा सेना कार्यकर्ते सामने येऊ नयेत या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे, मुंबईकरांना शांततेच आवाहन करण्यात आले असून पोलिसांची ताकद लागणार आहे.
दुपारी 4 वाजता शिवसेना भवनात होणारी पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिस अधिकारी, ट्रॅफिक पोलिस अधिकारी दाखल झाले असून तयारीचा आढावा घेत आहेत. शिवसेना भवन परिसरातील सुरक्षा व्यवस्था देखील वाढवण्यात आली असून सर्वेलन्स व्हॅन देखील सेना भवन परिसरात बघायला मिळत आहे. दुपारपासून शिवसेनेचे खासदार, आमदार आणि पदाधिकारी आज शिवसेना भवनात दाखल होत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम