द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; सोग्रस ते सटाणा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी भारतीय जनता पक्षाने आंदोलनाचा इशारा देताच संबंधित विभागाने सदरचा खड्डेयुक्त रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्याने उद्याचा रस्ता रोको स्थगित करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण यांनी दिली.
सोग्रस फाटा ते सटाणा या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तात्काळ करण्यात यावे या मागणीसाठी आमदार डॉ. राहुल आहेर व भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी(दि. १४)रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते. परंतू सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता आर .के. पाटील यांनी उभय नेत्यांशी चर्चा करून सदरचे काम लगेचच गुरुवारी सकाळी सुरू करणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्याने भारतीय जनता पक्षाने पुकारलेले रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती शेवटी तालुका अध्यक्ष चव्हाण यांनी दिली.
भावडबारी सोग्रस राष्ट्रीय महामार्ग क्र . ७५२ या रस्त्यावर मोठया प्रमाणत खड्डे पडले असल्याने सदर रस्त्यावर (१४) रोजी रस्ता रोको निवेदनाच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अखत्यारीत असलेले भाबडबारी सोग्रस व राष्ट्रीय महामार्ग क्रं . ७५२ या रस्त्यावरील देखभाल दुरुस्तीचा कार्यक्रम विभागीय कार्यालयास सादर केलेला असून त्यास मंजुरी प्राप्त होतास सदर लांबीतील खड्डे भराण्याचे काम सुरु करणेत येईल . तसेच सदर रस्त्यावर पुरहानी कार्यक्रम सन २०२०-२१ अंतर्गत खालील कामे मंजूर असुन त्या अंतर्गत खड्डे भरण्याचे काम तात्काळ सुरु करण्याचे आदेश संबधीत ठेकेदारास देण्यात आलेले आहेत . १. प्रकाशा छडवेल पिंपळनेर सटाणा देवळा रस्ता . म . मा क्रं . ७५२ जी ( जुना रा . मा . ०७ ) किमी १६२/५०० ते १६४/५०० ( भाग भीलवाड फाटा ते भाबडबारी घाट ) ता . देवळा २. प्रकाशा छडवेल पिंपळनेर सटाणा देवळा रस्ता रा . म . मा क्र . ७५२ जो जुना रा . मा . ०७ ) किमी १६४/५०० ते १६६/५०० ( भाग भाबडबारी घाट ते प्रजिमा ६३ ) ता . देवळा किमी १६०/५०० ते ३. प्रकाशा छडवेल पिंपळनेर सटाणा देवळा रस्ता रा . म . मा . ७५२ जी ( जुना रा . मा . १६२/५०० ( भाग भावडेफाटा ते म्हसोबा मंदिर ) देवळा वरील कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेले असून सदरची कामे तात्काळ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
इंजि . आर . के . पाटील सहाय्यक अभियंता ( श्रेणी -१ ) , सा.बां . उपविभाग , देवळा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम