देवळा प्रतिनिधी : देवळा नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीकाँग्रेसचे दोन शिलेदार विजयी झाले त्यात गोटु शिंदे हे राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांची राजकीय सुरवात ही शरद पवारांच्या विचारांनी प्रेरित होऊन झाली आहे. देवळा शहरात दोन गटात दुभंगलेली राष्ट्रवादी हवी तशी मैदानात उतरली नाही मात्र गोटु शिंदे यांनी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य योगेश आबा आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या विजयाचे गणित आखले अन त्यात ते ‘सक्सेसफुल’ ठरले आहेत.
भाजपाच्या उमेदवारांचे सर्वत्र वातावरण असतांना शिंदेंनी आपला विजयश्री खेचून आणला राष्ट्रवादीचे शहरातील अस्तित्व उरते की नाही अशी परिस्थिती भाजपा नेत्यांनी केली होती. त्याला कारणही तसेच होते. मात्र या सर्व वातावरणाला पुरून उरत आपला झेंडा फडकवला. संयमाने प्रचाराची रणनीती आखत भाजपाचे बलाढ्य उमेदवार त्यात अपक्ष उमेदवाराने दिलेले आवाहन अशा तिरंगी लढतीत केलेल्या कामाच्या जोरावर शिंदेचा विजय सोपा झाला.
प्रभागात गेल्या वेळी झालेल्या निसटत्या पराभवानंतर देखील खचून न जाता देवळा शहरात आपला कामाचा शिलशीला कायम ठेवला. प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जात योग्य वेळी भाजपाचा या वॉर्डात ‘करेक्ट कार्यक्रम’ केला. तीनही उमेदवार तोडीसतोड असतांना झालेली लढत लक्षवेधी ठरली मात्र संयमाने घेतलेले निर्णय तसेच महिला वर्गाने दिलेली साथ सामाजिक कार्य याच्या बळावर विरोधकांना पराभवाची धूळ चारली. अन तालुक्यात पक्षाची अब्रू देखील वाचवली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम