द पॉईंट नाऊ : देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुल्या महिला प्रवर्गासाठी निघाल्याने पुन्हा एकदा देवळा नगरपंचायतीचा कारभार महिलेच्या हाती जाणार जाणार आहे. यामुळे अनेकांचा हिरमोड झाला असून, आता नूतन नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे लवकर पहावयास मिळणार आहे.
नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर आज मंत्रालयात नगराध्यक्ष पदासाठी दुपारी चार वाजता आरक्षण सोडत काढण्यात आली. यात देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षण निघाले . यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला असून, पुन्हा एकदा महिलेच्या हाती देवळा नगरपंचायतीचा कारभार गेला आहे.
देवळा नगरपंचायत निवडणूकिती खुल्या प्रवर्गातील निवडून आलेल्या महिला नगरसेविका पुढीलप्रमाणे –
प्रभाग क्रमांक 4 मधूम माजी सरपंच सुलभा जितेंद्र आहेर,
प्रभाग क्रमांक 15 मधून सुनंदा आहेर,
प्रभाग क्रमांक 11 मधून भाग्यश्री पवार,
प्रभाग क्रमांक 6 मधून शीला आहेर,
प्रभाग क्रमांक 8 मधुन भारती आहेर ,
प्रभाग क्रमांक 12 मधून रत्ना मेतकर तर
प्रभाग क्रमांक 1 मधून एशवर्या आहेर यांचा समावेश आहे .
या खुल्या प्रवर्गातील निवडुन आलेल्या सात महिलांपैकी 6 महिला नगरसेविका भाजपाच्या असून, 1 विरोधी गटाची आहे . एकूण 17 पैकी 15 जागा जिंकून भाजपने निर्विवाद बहुमत सिद्ध केले आहे . यामुळे नगराध्यक्ष पदासाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे देवळा वासीयांचे लक्ष लागून आहे . अत्यंत अटीतटीच्या प्रभाग क्रमांक 11 मधूम माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार यांच्या सुविद्य पत्नी भाग्यश्री पवार सर्वाधिक मताधिक्याने निवडणूक आल्या आहेत तर प्रभाग क्रमांक 4 मधून नगरसेवक माजी गटनेते जितेंद्र आहेर यांच्या सुविध्य पत्नी माजी सरपंच सुलभा आहेर निवडणूक आल्या आहेत .
सुरुवातीला या दोघांपैकी एकाची नगराध्यक्ष पदासाठी निवड नक्की मानली जात आहे . यासाठी पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात . हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम