स्वप्निल अहिरे,
आराई ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत असलेले, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान, नवसाला पावणारे अशी ख्याती असलेले तालुक्यातील भाक्षी येथिल खंडेराव महाराज यांचा यात्रोत्सव ” देवूळ बंद ” असुनही मोठ्या उत्साहात पार पडला.
चंदनपुरी नंतर बागलाण तालुक्यातील भाक्षी येथे खंडेराव महाराज यांचे जागृत देवस्थान आहे पौष पौर्णिमेला भरणारा यात्रोत्सव व दैवत लाखो भाविकांच्या नवसाला पावनारे आहे पण गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूमुळे शासनाने सर्वच मंदिरे व त्यांचे यात्रा उत्सव बंद केल्याने या वर्षी ही अनेक भाविकांना त्याचा फटका बसला असून ” देवूळ बंद ” असल्याने हजारो भाविकांनी लांबूनच दर्शन घेणे पसंत केले. या वेळी हजारो कोंबडे व बोकडाचा बळी देवून आपल्या घरीच कार्यकम करणे पसंत केले आहे.
आज मंगळवार चा मुहूर्त असल्याने सकाळी पासुनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती आबाल वृध्दसह बाल गोपाळनी यात्रेला मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पण मंदिरात दर्शन बंद असल्याने अनेकांचा हिरमोड मात्र झालेला बघायला मिळाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम