द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : पाळीव प्राणी हा मुका असला तरी तो प्रामाणिक असतो याचे उदाहरण अनेकवेळा बघितले आहे. पाळीव प्राण्यांच्या निष्ठेच्या अनेक कहाण्या आपण ऐकल्या आहेत. पण पुण्यातल्या वडगाव शेरी मध्ये चक्क भटक्या कुत्र्याने लोकांचा जीव वाचवल्याची घटना घडली आहे.
पुण्यातील वडगाव मधल्या ब्रम्हा सन सिटीच्या गार्डन मध्ये विषारी साप आढळून आला होता. हा साप दिसल्यानंतर परिसरातल्या हा भटक्या कुत्र्याने त्यावर झडप घातली. झटापटीमध्ये साप दोन वेळा या श्वानाला चावला. मात्र त्यानंतरही त्याने पकड सोडली नाही.
त्या ठिकाणी सर्पमित्र आणि प्राणीमित्र दाखल झाल्यानंतर त्यांनी या श्वानाला दवाखान्यात नेण्यात आलं मात्र अखेर या त्याला आपला जीव गमवावा लागला. पण या भागात अनेक लहान मुलं खेळत असल्याने त्यांचा जीव या श्वानाने वाचवला असल्याची भावना रहिवासी व्यक्त करत आहेत. यामुळे प्राणी माणसाशी किती प्रामाणीक आहेत याचा प्रत्यय वेळोवेळी येतो.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम