भगवा ध्वज होऊ शकतो भारताचा ‘राष्ट्रध्वज’!

0
33

द पॉईंट नाऊ ब्युरो : भगवा भारताचा राष्ट्रध्वज होऊ शकतो. असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते कल्लाडका प्रभाकर भट यांनी केले आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

संसदेत सर्व हिंदूंनी मिळून यासाठी मतदान केले. तर भगवा नक्कीच भारताचा राष्ट्रध्वज होऊ शकतो. असे भट म्हणाले. याआधी भाजपचे कर्नाटक मधील नेते के. एस. ईश्वरप्पा यांनी देखील भविष्यात भगवा भारताचा राष्ट्रध्वज होऊ शकतो. असे म्हटले होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक हिंदू संघटना आहे. हिंदू संस्कृतीच्या दृष्टीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात. तर विशिष्ट नियमावली देखील पाळली जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील सदस्यांना कट्टर हिंदू म्हणून ओळखले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे नेहमीच हिंदुत्वबाबत, हिंदूंच्या अधिकारांबाबत, भाष्य केली जातात. आता भट यांनी देखील भगवा राष्ट्रध्वज होऊ शकतो असे म्हटल्याने सर्वांचे त्यांच्याकडे लक्ष वळले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here