
देवळा : तालुक्यातील भऊर येथील विविध कार्यकारी सेवा सहकार सोसायटीच्या १३ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत ३२ पैकी १९ उमेदवारांनी शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने संपूर्ण १३ जागा बिनविरोध झाल्याने, सलग चौथी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे.

या पंचवार्षिक निवडणुकीत १३ जागांसाठी ३२ अर्ज दाखल झाल्याने, चालत आलेल्या परंपरेला छेद जातो की काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, माघारीच्या शेवटच्या दिवशी गावातील गावातील जेष्ट नागरिक तथा तरुण वर्गाच्या विशेष प्रयत्नातून १९ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला व बिनविरोध निवडीची परंपरा राखली गेली.
१९ उमेदवारांच्या माघारी नंतर, कर्जदार खातेदार प्रतिनिधी साठी पोपट भिवसन पवार, पांडुरंग शिवाजी पवार, अभिमन वसंत पवार, दौलत नारायण पवार, बाळू पांडुरंग पवार, अरुण शिवाजी पवार, सुनील भाऊराव पवार, दादाजी महादू पवार. अनुसूचित जाती/ जमाती प्रतिनिधी साठी गरुड संतोष विठ्ठल. महिला प्रतिनिधी म्हणून सिंधुबाई जीभाऊ पवार, सुंदर नामदेव पवार. इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधी साठी काकाजी दगा पवार व भ.वि.जा./ज./ विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी साठी राहुल मधुकर परदेशी या १३ उमेदवारांचे अर्ज १३ जागांसाठी शिल्लक असल्याने पूर्ण निवडणूक बिनविरोध झाली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम