सोमनाथ जगताप
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : देवळा तालुक्यातील भऊर येथील नेपाळी वस्ती येथील प्रवीण रामदास पवार यांच्या राहत्या घराच्या छतावर किंग कोब्रा नाग दिसून आल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान चांदवड येथील सर्प मित्रांना तीन तासात या सापाला पकडण्यात यश आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.५ रोजी सायंकाळी प्रवीण पवार यांच्या राहत्या घराच्या छतावर पवार यांच्या पत्नी पूनम पवार यांना हा साप दिसून आला. साप साधारण पाच ते सहा फुटाचा असल्याने त्या पूर्णतः घाबरल्या होत्या. पती प्रवीण कामानिमित्त बाहेरगावी गेलेले असल्याने त्यांनी त्वरित शेजारील नागरिकांना बोलावून छतावरील नाग दाखवला. यावेळी येथील आबाजी पवार यांनी लागलीच चांदवड येथील सर्प मित्रांना संपर्क केला.
सर्प मित्र संदीप बडे व त्यांचे सहकारी मुन्ना सय्यद यांनी घटनास्थळी घाव घेतली. साधारण तीन ते चार तासाच्या प्रयत्नांनंतर त्यांना साप पकडण्यात यश आले. या बाबत सर्प मित्रांनी चांदवड वनविभागाला माहिती दिली असून, सुरक्षित ठिकाणी जंगालात या किंग कोबरा सापाला सोडण्यात येणार असल्याचे सर्पमित्र यांनी सांगितले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम