चांदवड : तालुयातील रायपूर येथील ब्युटी पार्लरमधून हॅन्डबॅगमधील सोन्याचे दागिणे, मोबाईल व रोकड असा एकूण एक लाख ६५ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला.
रायपूर येथील ज्योती देविदास आहेर या रविवारी (दि. २४) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास रायपूर येथील वैष्णवी ब्युटी पार्लरमध्ये अॅब्रो करत असताना महिलांच्या गर्दीमध्ये हॅन्डबॅगमधील ६० हजार रुपये किमतीचे अडीच तोळे वजनाचे लॉकेट, प्रत्येकी ३० हजार रुपये किमतीच्या प्रत्येकी एक तोळे वजनाच्या ३ अंगठ्या, ५ हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅम वजनाचे कर्णफुले, ८ हजारांची रोकड, २ हजार रुपये किमतीचा एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण १ लाख ६५ हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरुन नेला.
याबाबत ज्योती आहेर यांनी चांदवड पोलिसांत फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम