द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; व्यक्तीकडून स्वतःच्या बुद्धिसामर्थ्याच्या आधारे निर्माण करण्यात आलेले कोणतेही संगीत, साहित्यिक कृती, कला, शोध, प्रतीके, नाव, चिन्ह, डिझाइन,आवाज, कॉपीराइट, ट्रेडमार्क आणि पेटेन्ट या बौद्धिक संपदा आहेत.
ज्याप्रमाणे भौतिक संपत्तीची मालकी एखाद्या व्यक्तीकडे असते, तशीच अशा एखाद्या बौद्धिक संपदेची मालकी एखाद्या व्यक्तीकडे असू शकते. असे विचार युनिव्हर्सिटी ऑफ सान्टीयागो डी- कॉम्पोस्टेला स्पेन येथील आंतरराष्ट्रीय कायद्याच्या प्रतिष्ठित प्रोफेसर आणि चायना युथ ऑफ पॉलिटिकल स्टडीज बीजिंग येथील इंटरनॅशनल लॉ आणि ह्युमन राईट्सच्या व्हिजिटिंग प्रोफेसर डॉ. अँटोनिट्टा एलिया यांनी येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाने आयाेजित केलेल्या आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये व्यक्त केले.
या समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य हितेंद्र आहेर होते.
अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. जयवंत भदाणे यांनी प्रास्ताविकात अतिथींचा परिचय व वेबिनारबद्दलची भूमिका मांडली. कार्यक्रमाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संभाजीराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
बाैध्दीक संपदा अधिकाराचे राष्ट्रीय परिप्रेक्षातून विवेचन करताना नंदुरबारच्या एनटीव्हीएस लाँ.कालेजचे प्रा डॉ. एस.एस.हसानी म्हणाले की,
काही वस्तूंचे गुणधर्म त्या कुठे बनवल्या जातात यामुळे ठरतात. विशेषत: तो शेतमाल किंवा हाताने बनणारे उत्पादन म्हणजे हातमागावर विणली जाणारी वस्त्रे, हाताने बनवलेली खेळणी वगैरे. असेल तर त्यांचे गुणधर्म त्यांच्या उत्पादनाच्या जागेवरून नक्की बदलतात. म्हणून “नागपुरी” संत्री, “रत्नागिरी” हापुस, यातली जी स्थानदर्शक नावं आहेत ती भौगोलिक निर्देशक या बौद्धिक संपदेने संरक्षित आहेत.
नवनव्या संशोधनांवर देण्यात येणारी पेटंट, उत्पादनांची चिन्हे म्हणून वापरली जाणारे ट्रेडमार्क्स, पुस्तके, संगीत, चित्रपटावर दिले जाणारे कॉपीराइट, भौगोलिक निर्देशक, औद्योगिक डिझाइन, ट्रेड सिक्रेट्स या बौद्धिक संपदा आधुनिक काळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक महत्वाच्या आहेत. आधुनिक व्यवसायाची व्यापक जाहिरात आणि प्रलोभनक्षम विक्रीमुळे कॉपीराइट, पेटंट आणि डिझाईन्समधील मालमत्ता मूल्यवान बनल्या आहेत. पेटंट, डिझाईन्स स्वामीत्व हक्क आणि ट्रेड मार्क्सची तपासणी आणि मंजूरी देण्याच्या प्रक्रियेत अलिकडे खुप सुधारणा झाल्याचे प्रा.हसानी यांनी सांगितले.
सहभागी प्रतिनिधींच्या वतीने पॉल मॅक ऑलिस्टर (अमेरिका) यांनी विषय निवडीबद्दल व उपयोगीतेबद्दल समाधान व्यक्त केले व महाविद्यालयाचे काैतुक केले.
अर्थशास्त्र विभागाच्या या आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये भारताच्या विविध राज्यातील प्राध्यापक तसेच चीन, माेरिशस, जर्मनी, स्पेन, अमेरिका व व्हीएतनाम देशातील संशाेधकांनी सहभाग घेतला. महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. मालती आहेर, प्राेफे.डॉ.सुहास आव्हाड संगमनेर, प्राेफे.डॉ.अरविंद शेलार पुणे, प्राेफे. डॉ. रामचंद्र रसाळ प्रवरानगर, समन्वयक राकेश घाेडे यांच्यासह मोठ्या संख्येने प्राध्यापक, कर्मचारी, नियोजनकर्ते तज्ज्ञ आणि संशाेधक सहभागी झाले होते.
उपप्राचार्य डॉ. ए.बी.पवार यांनी आभार प्रदर्शन केले. प्रा.एम.आर.बच्छाव व प्रा. निरज थाेरात यांनी विशेष परिश्रम घेतले .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
elobrate excellent views point…