द पॉईंट नाऊ ब्युरो : मुलगा पाण्यात बुडू लागल्याने अंध पित्याने पाण्यात त्याला वाचवण्यासाठी उडी घेतली. मात्र या घटनेत पिता – पुत्र दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सातारा जिल्ह्यात कोडोली जवळ ही दुर्दैवी घटना घडली. अंकुश साळुंखे आणि त्यांचा मुलगा प्रीतम साळुंखे हे दोघेही कृष्णा नदीमध्ये कपडे धुण्यासाठी गेले होते. मात्र यादरम्यान मुलगा पाण्यात बुडू लागल्याने बापाने त्याला वाचवायला पाण्यात उडी घेतली. यात दोघांनाही आपला जीव गमवावा लागला.
कृष्णाधाम परिसरात ही घटना घडली. दोघाही पिता – पुत्राच्या दुर्दैवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम