बिबट्या ‘मस्तीत’ वन विभाग ‘सुस्तीत’ ; दहिवड येथे घोड्याचा फडशा

0
39

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा तालुक्यात सध्या बिबट्या ने हैदोस घातला आहे, गेल्या आठवड्यात दहिवड येथे मेंढी फस्त केली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. वन विभागाला स्थानिकांनी वेळोवेळी माहिती देऊनही वनविभाग मात्र सुस्त असल्याचे चित्र आहे. सध्या नागरिक मात्र भीतीत आहेत.

दहिवड येथील पिंपळे (येली झेली) मळा येथील गोरख भिका वाघ यांच्या मेंढ्यांच्या वाड्याजवळ पहाटेच्या सुमारास बिबट्याने 5 वर्षीय घोड्यावर हल्ला करून घोड्याचा फडशा पाडलेला आहे. यामुळे मेंढपाळांसह परिसरातील शेतकरी भयभीत आहेत.

बिबट्याचा वारंवार होणारा प्राण्यांवरील हल्ला हा वनविभाग देवळा यांनी गांभीर्याने दखल घेऊन लक्ष घालणे गरजेचं आहे. आज प्राण्यांचा जीव गेलाय भविष्यात वेगळा काही अनर्थ घडायला नको याची खबरदारी घेणे गरजेचं आहे.

नागरिकांनी देखील रात्री अपरात्री कुठे फिरू नये पाळीव प्राण्यांची काळजी घेणं गरजेचं आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here