बिबट्याची कातडी विकणारे सराईत गुन्हेगार वनविभागाच्या ताब्यात

0
38

नाशिक प्रतिनिधी : माणूस पैशासाठी इतका हापापला की त्याला पैशाच्या हव्यासापोटी काहीही सुचत नाही. नाशिक जिल्ह्यात बिबट्याच्या कातडीसह सात जणांनाच्या मुसक्या वनविभागाने आवळल्या आहेत. घोटी-सिन्नर रस्त्यावर शहापूर वनविभागाने धडक कारवाई केली असून याप्रकरणी सात संशयितांना ताब्यात घेतले आहे, संशयित हे नाशिकच्या इगतपुरी व त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) तालुक्यातील तर एक संशयित जव्हार तालुक्यातील मोखाडा (Mokhada) येथील असल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी, शहापूर वनविभागातील अधिकाऱ्यांना वाशाळा वनपरिक्षेत्र परिसरात नाशिक जिल्ह्यातून काही संशयित बिबट्याच्या कातडीची विक्री (leopard skin smuggling) करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या टीप वरून १९ जानेवारीपासून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. या सापळ्यात शहापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी व वन्यप्राणी मित्र संतोष जगदाळे हे बनावट ग्राहक बनले होते.

त्यांनी या संशयितांना संपर्क केला; यानंतर या संशयितांनी भेटण्याचे ठिकाण वाशाळा इथून बदलून घाटनदेवी मंदिर परिसरात भेटण्याचे ठरविले. तसेच तेथे त्यांना या संशयितांनी बिबटयाच्या कातड्याची मोबाईलवर व्हिडिओ दाखवून त्याचा व्यवहार करायचे सांगितले
परंतु त्यादिवशी या संशयितांनी व्यवहार केला नाही. यानंतर पुन्हा या संशयितांनी बनावट ग्राहकाला मोबाईलवर कॉल करून बिबट्याच्या कातडीची विक्री करण्याचे ठरवले.

आज, 02 फेब्रुवारी 2022 रोजी पुन्हा एकदा व्यवहाराकरिता पहिल्यांदा घाटनदेवी मंदिर परिसरात बोलवले. यानंतर ठिकाण बदलून मौजे उभाडे गावाजवळील घोटी सिन्नर रस्त्यालगत ठिकाण ठरले. त्यानुसार शहापूरचे उपवनसंरक्षक वसंत घुले (RFO Vasant Ghule) यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक वनसंरक्षक अमोल जाधव यांच्या नेतृत्वात वनपरिक्षेत्र अधिकारी वाशाळा-विशाल गोदडे वनपरिक्षेत्र अधिकारी खर्डी- प्रशांत देशमुख व वनपरिक्षेत्र अधिकारी शहापूर- प्रकाश चौधरी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्त सापळा रचला.

यावेळी बिबट्याच्या कातड्याचा व्यवहार करताना या सातही संशयितांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांच्या चार दुचाकीदेखील ताब्यात घेण्यात आल्या.

संशयित काळु सोमा भगत वय 36 वर्षे रा. भावली ता. इगतपुरी जि. नाशिक.
रघुनाथ शंकर सातपुते वय 34 वर्ष.रा.मोखाडा ता. जव्हार.जि पालघर.
मुकुंदा सोमा सराई. वय 55 वर्ष. रा अस्वली हर्ष. ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक.
गोटीराम एकनाथ गवारी. वय 34 वर्षे रा. सामोडी ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक.
अशोक सोमा मेंगाळ वय 29 वर्ष. रा भावली ता. इगतपुरी. जि नाशिक.
योगेश लक्ष्मण अंदाडे. वय 26 वर्ष. रा. फागुळगव्हान.ता. इगतपुरी जि.नाशिक.
अर्जुन गोमा पानेडा. वय 28 वर्ष. रा. चाफयाचापाडा (शिरोळ). ता.शहापुर जि.ठाणे या संशयितांना ताब्यात घेतल्या आले आहे. याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here