बिबट्याचा शेतमजूरावर हल्ला, दोन दिवसांन आढळला मृतदेह

0
22

नाशिक शहराच्या पश्चिमेला गंगापूर, आळंदी या दोन्ही धरणांपासून जवळ असलेल्या गिरणारे शिवारात बिबट्याचे हल्ला केला. महिनाभरानंतर बिबट्याच्या हल्ल्याने मनुष्याचा हा दुसरा बळी गेला आहे. या भागात पुन्हा एका शेतमजुरावर बिबट्याने झडप घेत त्याला फरफटत शेतात नेले. ऊसाच्या शेतात दोन दिवसांनी मृतदेह आढळून आला. परिसरात एकच खळबळ माजली आहे.

नाशिक येथील आदिवासी शेतमजूर गिरणारे पंचक्रोशीत रोजंदारीने शेतीच्या कामासाठी स्थलांतरीत करतात. आज सकाळी येथील शेतात निम्म्यापेक्षा अधिक प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत दिलीप काशिनाथ थेटे यांच्या मालकीच्या गट क्रमांक ३५४मधील शेतात अर्धवट खाल्लेला पुरूष जातीचा मृतदेह आढळून आला.या हल्ल्यात अरूण हिरामण गवळी (२७,रा.अलीवपाडा, हरसूल) हा मृत्यूमुखी पडला आहे. गिरणारे टमाटा मार्केटच्या जवळ ऊसाच्या शेतात बिबट्याने अरुण गवळी मजुरावर दोन दिवसांपुर्वी हल्ला केला.

या वेळी हल्ल्यातच अरूणचा मृत्यू झाला. बेपत्ता असल्यामुळे सर्वत्र त्याचा शोध सुरू होता. परंतु गावाकडे परतला असेल, म्हणून त्याच्यासोबत असलेल्या मजूरांनी तालुका पोलिसांना कळविले नाही. दुपारच्या वेळी पोलीस, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या शेतमजुरांनी मृतदेह अरूणचा असल्याचे ओळखले. पोलीस, वनविभागाने जागेवर पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठविण्यात आला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here