बिग बॉस 15 मधून शमिता शेट्टीच बाहेर पडण्याच कारण स्पष्ट, पाहा नेमकं काय आहे कारण ?

0
153

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : बिग बॉसच्या १५ व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे. शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीम वर आधारित .

मात्र या शोमध्ये सहभागी झालेली शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी शोमधून काही कारणास्तव बाहेर गेली यावरून शमिताला नेमकं काय झालं होतं हा प्रश्न अद्यापही चहात्यांच्या मनातच आहे. बिग बॉस 15 मधून शमिता शेट्टी प्रकृती कारणास्तव का बाहेर पडलेली याचं नेमकं कारण काय हे तिची आई सुनिता शेट्टी यांनी स्पष्ट केला आहे.

बिग बॉस मधून काहीकाळ गायब राहिलेल्या शमिता ने आत्ता शो मध्ये धमाकेदार वापसी केले आहे. पण शमिता ला नेमकं काय झालं होतं हा प्रश्न अद्यापही चाहत्यांच्या मनात आहेच. तर आता त्याचा खुलासाही झाला आहे. शमिता वर्षानुवर्ष एका गंभीर आजाराला झुंज देतेय या आजारामुळे ती सामान्य अन्य पदार्थ खाऊ शकत नाही केवळ ग्लूटेन फ्री ग्रँन्यूल्स ती खाते. हा काय आजार आहे तर या आजाराला कोलायटिस म्हणतात. कोलायटीस एक दाहक आतड्यांचे आजार आहे. .

कोलायटीस म्हणजे नेमकं काय :

या आजाराच्या रुग्णांच्या पचन मार्गात सूज येते. आणि जखमा होतात. मोठ्या आतड्याला किंवा आतड्याच्या आतील अस्तराला समस्या निर्माण होऊ शकतात कोलाइटिसचा पोटामधील छोट्या आतड्यावर देखील परिणाम दिसू लागतो. मुरड पडणे, पोटात दुखणे, थंडी वाजून ताप येणे , शौचातून रक्त जाणे, अतिसार आणि अशा बऱ्याच समस्या रुग्णाला सहन कराव्या लागतात . म्हणून या आजारामुळे शामिता ग्लूटेन फ्री डाएट घेते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here