बालाजी आडतचा मनस्ताप शेतकऱ्यांना ; वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर

0
11

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; बाजार समिती अन व्यापारी हे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अस्तित्वात आहेत मात्र देवळा तालुक्यात शेतकऱ्यांच्या जीवावर मोठे होऊन त्यांनाच धमकावले जात असल्याचा आरोप प्रहार संगटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा जाधव यांनी केला आहे.

तालुक्यातील वाजगाव खर्डे रस्त्यावर असलेल्या बालाजी आडत मुळे शेतकऱ्यांना रस्त्यावर ताटकळत उभे रहावे लागत आहे. बालाजी आडत ने शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था निर्माण करणे गरजेचे असतांना मात्र याठिकाणी नियमांना तिलांजली दिली आहे. मुख्य रस्त्यावर शेकडो ट्रॅक्टर, पिकअप उभे असतात. यामुळे येणारे जाणारे प्रवाशी तासनतास ट्रॅफिक मध्ये अडकत असतात.

अनेक नागरिकांनी वेळोवेळी तक्रार बाजार समितीकडे केली आहे मात्र, प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतली आहे, जो तक्रार करायला जाईल तो व्यापाऱ्यांच्या हिटलिस्टवर जाणार असल्याने तक्रारदार देखील हिम्मत करत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

बाजार समितीला सहकार विभागाची काही नियमावली आहे, मात्र या नियमांना काही व्यापाऱ्यांनी धाब्यावर बसवले आहे. बाजार समिती पासून शेतमालाचे गोडावून 3 किमी. अंतरावर असणे बंधनकारक आहे, त्यापेक्षा जास्त अंतर असल्यास शेतकऱ्यांना होणार वाहतुकीचा खर्च हा संबंधित व्यापाऱ्यांनी देणं गरजेचं असत, स्वतंत्र पार्किंग व्यवस्था आवश्यक आहे, मात्र अनेक ठिकाणी याचा अभाव आहे.

शेतकऱ्यांना इतक्या लांब यावे लागते हे नियम बाह्य असून देखील शेतकरी शांत आहे, यामुळे भविष्यात त्यांच्या सहनशीलतेचा अंत व्यापाऱ्यांनी बघू नये किमान स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करावी जेणेकरून संभाव्य वाद टळेल याची काळजी बाजार समिती व व्यापाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे.

वाजगाव खर्डा रोडवरील बालाजी आडत चा मनमानी कारभार कायम आहे, वेळोवेळी तक्रार करुन ही हिच समस्या आहे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. सर्व सामान्य प्रवासी अडचणीत येताय. मार्केट यार्ड पासुन खरतर तीन किलोमीटर च्या पुढे कांदा खरेदाराचे गोडाऊन कायद्याने नसते पण यांच्या मनमानी कारभार मुळे शेतकरी व सर्व सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. विषेश म्हणजे हा बालाजी आडतदार पैशाने मोठा असल्याने तक्रार करणाऱ्यांना हातपाय तोडन्याची भाषा वापरतो. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करणे हाच पर्याय आहे. वेळीच प्रशासनाने हस्तक्षेप करून कारवाई करावी .अन्यथा प्रहार स्टाईल ने आंदोलन छेडू.
कृष्णा जाधव , प्रहार संघटना

डिझेलच्या वाढत्या किंमती बघता, शेतकऱ्यांना जास्त दूर जावे लागते, याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळायला हवा, सचिवांकडे दोन वेळा तक्रार करून देखील याकडे लक्ष दिले जात नाही. हे अतिशय गंभीर आहे, सर्व वाहने रस्त्यावर उभे असल्याने त्याच्यातून अपघात देखील होऊ शकतो, या सर्व बाबींचा विचार होणे गरजेचे आहे. – सुनील पगार , शेतकरी रामेश्वर

व्यापारीही आपले अन शेतकरी देखील आपले आहेत, यामुळे दोघांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल, संबंधित व्यापाऱ्यांना सूचना करून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, भविष्यात वाहतुकदारांना तसेच शेतकऱ्यांना त्रास होणार नाही यासाठी काळजी घेतली जाईल.
– निकम साहेब , सचिव देवळा बाजार समिती


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here