द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : निकाल लागला मात्र गुणपत्रकासाठी आतुर असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला होता. त्यानुसार गुणपत्रिका 21 ऑगस्टपासून त्यांच्या महाविद्यालयात देण्यात येणार आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठरावीक दिवशीच गुणपत्रिका नेण्याची सक्ती विद्यार्थ्यांवर करू नये, अशी सूचना राज्य मंडळाने कनिष्ठ महाविद्यालयांना दिली आहे. यामुळे आजपासून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळणार आहेत.
राज्यात कोरोना वाढता प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत, प्रत्येक वितरण केंद्राला जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या लक्षात घेऊन जास्त वितरण केंद्रे निर्माण करणे, किंवा त्याच वितरण केंद्रावर सुरक्षित अंतर ठेवून वितरण खिडक्यांची संख्या वाढवून गुणपत्रिका वितरित कराव्यात, अशा सूचना मंडळाने दिल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची गर्दी लक्षात घेता वितरण केंद्रांना उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
असा लागलाय निकाल
10 वी मार्क्स यावर 30 %
11 वी मार्क्स यावर सरासरी 30 %
1व वी यासाठी अंतर्गत परिक्षा यावर 40 % गुण असतील
इयत्ता 12 वी च्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय गुण लक्षात घेतले जातील.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम