बारावीचा उद्या निकाल (3, ऑगस्ट रोजी) उत्सुकता शिगेला

0
44

द पॉईंट प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचा (HSC) निकाल उद्या लागणार आहे. या संदर्भातील सर्व तयारी बोर्डाने पूर्ण केली असून उद्या दुपारी निकाल लागणार आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय बोर्डाचा निकाल लागला होता. तेव्हापासून उत्सुकता शिगेला पोहचली होती.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बारावीचा निकाल 31 जुलै पर्यंत लागणे आवश्यक होतं, पण महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बारावीचा निकाल लांबणीवर पडला होता. यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा वाट बघावी लागली होती.

बारावीचा निकाल जाहीर करण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक ऑनलाइन स्वरूपात जाहीर करण्यात आले होते. हा बैठक क्रमांक विद्यार्थी http://mh-hsc.ac.in या संकेत स्थळाला भेट देऊन बघू शकतात.

आपला बैठक क्रमांक कसा बघायचा बघा सोपी पद्धत

http://mh-hsc.ac.in या संकेत स्थळावर सर्च सीट नंबर वर जा.

यानंतर आत मध्ये तुमचा जिल्हा आणि तुमचा तालुका निवडा

यानंतर तुमचं संपूर्ण आडनाव, विद्यार्थ्याचे नाव, वडिलांचे नाव याप्रमाणे त्यात नमूद करा.

यानंतर एंटर दाबा आणि तुमचा सीट नंबर तुमच्या समोर येईल

परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संपादित केलेले विषयनिहाय गुण खालील संकेतस्थळावर उद्या दुपारी ४.०० नंतर उपलब्ध होतील:
https://t.co/RvQBJwfzfS
https://t.co/1srwvwuOgV
https://t.co/FdRA3f0Z7F
https://t.co/smigUpoDgw
https://t.co/TDGwj5sZiU

@msbshse
@scertmaha https://t.co/qbxJPtsfO0


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here