देवळा प्रतिनिधी : रिपब्लिकन पक्षाच्या काही गटांच्या नेत्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व रिपब्लिकन पक्ष विक्षिष्ट जातीपुरता मर्यादित करून ठेवल आहे. यापुढे इतर समाज घटकांचे संघटन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत रिपब्लिकन पक्षाची बांधणी करण्याचा मनोदय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ए ) चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी व्यक्त केला.
रिपब्लिकन पार्टी इंडिया ( ए ) उत्तर महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवळा येथे दि.(१) रोजी संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
तत्पूर्वी जिल्हाध्यक्ष दिनेश आहिरे व कार्यकर्ते यांनी निकाळजे यांचे जल्लोषात स्वागत केले.निकाळजे व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली आहे.
यावेळी बोलताना दीपक निकाळजे म्हणाले की रिपब्लिकन ए पक्ष सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आमचा पक्ष सदैव कटिबद्ध असुन विशेषतः पदाधिकारी व पक्ष बाधणीकडे लक्ष केंद्रित केले असून व आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवणुकांध्ये पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे आवाहन निकाळजे केले.
याप्रसंगी उत्तर महाराष्ट्रातील जळगाव ,अमळनेर ,नगर ,नाशिक आदी जिल्हाध्यक्षांनी मनोगत व्यक्त करत पक्ष वाढीसाठी निकाळजे यांना आश्वासित केले आहे.
यावेळी महाराष्ट्र कार्यध्यक्ष बाळासाहेब पवार ,राज्य सचिव राजू आठवले ,राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ,शशिकांत दारोळे ,टी. एस सोनार ,अशोक गायकवाड ,पुंजाराम पवार ,अशोक गरुड,आप्पा केदारे ,उमेश सोनवणे ,गबा केदारे ,बॉबी पवार ,कैलास पवार ,रमेश पवार ,वसंत गांगुर्डे ,संदीप केदारे ,विकी वाकळे आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम