बापाला समजून घेताना…!

1
53

पप्पा ,बाबा, डॅड, ड्याडी, पॉप्स….बोलायला किती छान वाटतं ना….!! पण …तरीही आपण मुद्दाम जाणून बुजून त्यांना बाप ….नावाने संबोधतो…..असे म्हणतातं आई घराचे मांगल्य असते तर बाप घराचे अस्तित्व…! पण या बापाला कधी कोणी समजून घेतले आहे का….? बाप , बाबा समोर येताचं किव्हा शब्द येताचं मुलांची तोंडं बंद होतात… कारण आई मुलांवर प्रेम करते आणि बाप ओरडतो , रागवतो पण त्याच्या रागमागे त्याच ते हळवं मन कधी कोणी जाणून घेतलं का….? नेहमीच मुलांच्या तोंडून त्याच्या बद्दल वाईट ऐकायला मिळतं .

थोडक्यात वडिलांबद्दल कधी फारसं चांगलं ऐकायला मिळतं नाही …. पण सर्वचं वडील तसे असतात का …!याचा कधी कोणी विचार केला आहे का….?बाप मुलांवर ओरडला ,चिडला की बाप वाईट आणि आई मुलांचं सांत्वन करते म्हणून आई चांगली अशी सर्व मुलांची मानसिकता पहायला मिळते…..

दिवसभर उन्हा… तान्हात काबाडकष्ट करणारा बाप नेहमी एकटाचं पडतो….ज्योती पेक्षा समई जास्त तापते पण तरी सर्व श्रेय त्या समईलाचं जाते…. असे का….? रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आपल्या सर्वांच्या लक्षात राहते … पण आयुष्यभराच्या शिदोरीची सोय करणारा बाप कधीचं कुणाच्या लक्षात राहतं नाही…..!!कुटुंबाचा आधारस्तंभ म्हणून तो त्याची भूमिका बजावत असतो. कधीचं कसली हव्यासा ठेवत नाही जे पुढ्यात येईन ते खाऊन दिवस काढतो…. कुटुंबाची मुख्य भूमिका करूनही तो पडद्यामागेचं नेहमी राहतो….. आई आपला राग भांडून ,रसून, रडून कुणाला तरी बोलून व्यक्त होते हो… पण बाप कुणाला सांगेल त्याच्या मनात दडलेलं दुःख…..! तो कसा व्यक्त होईल कुणाजवळ….

त्याची पत्नी मरण पावली की मुलांना सांभाळणारा स्वतःचे अश्रू पुसून मुलांच्या अश्रूंना आवर घालणारा, धीर देणारा बापचं असतो हो…..!! देवकी, यशोदेच कौतुक तुम्ही अवश्य करा हो …! पण भर पुरातून पुत्राला डोक्यावरून आणणारा वासुदेव हा बापचं होता….! राम का कौशल्येचा पुत्र पण पुत्र वियोगाने तडफडणारा दशरत एक बापचं होता….अंगा खांद्यावर खेळवून रक्ताच पाणी करून उन्हा… तान्हात घाम गाळून मुलांची शिक्षण पूर्ण करतो…. दिवाळी आली की बाप फाटक्या सदर्यावरचं दिवाळी साजरी करतो…पण बायको पोरांना मात्र नवीन कपडे घेतो … टाचा झिजलेल्या चप्पल आणि बनियनला पडलेले होल त्याच्या नशिबाचे भोग आठवण करून देतात…. त्याचा तो दाढी वाढलेला चेहरा त्याची काटकसर दाखवून देतो. आज मुलं मोठी होतात पण बाप मात्र गरीबचं राहतो….मुलगा सलून मधून १०० रू खर्च करून येतो.मुलगी पार्लर मध्ये १५० रू करून येते . पण माझा बाप मात्र दाढीचा साबण संपला म्हणून आंघोळीच्या साबणाने आपली दाढी खरवडतो…..बाप आजारी पडला तरी डॉ.कडे नाही जातं.. पण बायको पोरं आजारी पडली की लगेच डॉ कडे घेवून जातो .कारण बापाला काळजी असते की डॉ कडे गेलो की डॉ आराम करायला सांगेल .मुलीचे लग्न मुलाच्या पुढील शिक्षणाची चिंता त्याला सतावत होती .मुलाला इंजिनियर करतो…. आणि मुलीचं लग्न थाटामाटात करतात….. अन् कधी तरी त्याचं बापाला हुंड्यासाठी डोक्यावरची पगडी पण पायावर ठेवावी लागते…. आणि येवढी सर्व लाचारी सहन करून बाप कधी आपले तोंड उघडत नाही…. निमूटपणे सर्व काही सहन करतं असतो….

अरे…..!ज्या घरात बाप असतो ना ….त्या घराकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाची हिम्मत ही होतं नाही .कारण त्या घरचा कर्ता पुरुष माझा बाप जीवंत असतो. अरे आई प्रेम लाड करते म्हणून बापाला विसरता तुम्ही… पण एक मात्र लक्षात ठेवा …!आई असण्याला किव्हा आई होण्याला बापामुळेचं अर्थ प्राप्त होतो…. आई बाबांच्या मारापासून वाचवते . आई पास झाल्यावर कौतुक करते … आंजारते, गोंजारत …..!पण हे सर्व माहीत असून शांत राहून गपचुप पेठे आणणारा तो बापाचं असतो रे…. आपल्या मुलांबद्दल बाहेर अभिमान कौतुक करणारा बाप तुम्हाला कधीचं कसा दिसत नाही…..
तुम्ही धडपडलात , खेळताना काही लागलं किंव्हा पडलात तर लगेच आपसुकच आई गं…! असं निघतं … पण तुम्ही एखादा मोठा रस्ता ओलांडताना भर वेगाने येणाऱ्या ट्रकने ब्रेक मारून संकट टळतं तेव्हा बाप रे……!! असाचं शब्द तोडांतून बाहेर येतो . छोटी छोटी संकटे आई झेलते हो… पण मोठी मोठी वादळे पेलणारा तो बापचं असतो हे लक्षात घ्या….

उन्हा तान्हात काबाडकष्ट करणारा , ऑफिस मध्ये रात्रीचा दिवस करणारा , शाळा , कॉलेज इतर ठिकाणी काम करणारा मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च , बायकोचा स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर,कपडा लत्ता पुरवणारा .. घरासाठी आणि मुलाबाळांसाठी स्वतःच्या स्वप्नांची राख रांगोळी करणारा माझा बाप खरचं किती ग्रेट असतो ना….!!! वडीलांचे महत्व हे त्यांनाच कळतं …ज्यांचे वडील लहानपापासूनचं सोडून जातात. आणि सर्व जाबाबदार्या स्वतःला पार पाडाव्या लागतात. पण जर बापाला खरचं कोणी समजून घेत असेल तर ती त्याची मुलगी असते… अगदी लहापणापासून ते लग्न करून सासरी गेल्यावर ही फोन वरून बाबांचा आवाज जरा जड आला की लगेच हजार प्रश्नांचा पाडा लावते मागे ….. आणि खरं काढून घेते. सारखं डॉ कडे का काळजी घ्या म्हणून सांगणारी मुलगीचं असते… थोडक्यात वडिलांची खरी काळजी ही मुलगीचं असते….वडील जरी रागवले तरी निमूटपणे ऐकून घेणारी आणि शांत राहणारी उलट नं बोलता वडिलांचा शब्द राखणारी मुलगीच असते ….. अरे…! आई जरी नारळातलं पाणी असली तरी वडील नारळाचं खोबर असतात हे विसरू नका …बाप वरून जरी कडक असला तरी आतून मात्र नरम आहे हळवा आहे…. फक्त त्याला कणखर आणि कडक राहवं लागतं कारण सर्व जबाबदाऱ्या त्याच्यावरच असतात… घराचं कर्ता असतो … त्यालाही मन आहे रे त्यालाही असंख्य दुःख आहेत … फक्त तो आपली व्यथा आणि दुःख आई सारखी कुणाला बोलून दाखवत नाही… एकटाचं सारं काही सहन करत असतो त्याच्या दुःखाचा हुंदका तो एकटाचं गिळत असतो .दुःखाची झळ तो कधीच कुणाला दाखवून देत नाही. एकांतातं मुसमुसून रडणारा तो बापाचं असतो.कधी तरी त्या बापाला समजून घ्या ना…..!! कठोरपणाचं रागाचं दूषण बाजूला ठेवून त्याच्यातील हळवा बाप लक्षात घ्या …!! दिवसभर थकून आला तरी मुलं झोपली असता मुलांच्या डोक्यावर मायेनं हात विरवणारा बाप लक्षात घ्या.. बाप जरी रागवला तरी आपल्या आशा , आकांशा, स्वप्ने पूर्ण करणारा बापचं असतो… चला त्याला एकदा आपण समजून घेऊ. …!! त्याला दोन प्रेमाच्या शब्दांची गरज आहे रे…!! मुकलेल्या प्रेमाची गरज आहे ….. जगण्याचे बळ अन् आयुष्याचे सार जीवनाचे सूर अन् चटके- फटाके खस्ता खातो सोडून ताप अन् देतो मायेची छाया त्या बापाला समजून घेताना…..!!!

लेखिका: पूनम गमरे(मुंबई)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here