बापाच्या संपत्तीवर मुलीचा हक्क अधिक – सर्वोच्च न्यायालय

0
76

द पॉईंट नाऊ ब्युरो : संपत्तीमध्ये मुलीचा अधिक हक्क असतो, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

कोणत्याही संयुक्त कुटुंब पद्धतीत संपत्तीवर चुलत भावांपेक्षा मुलीचा हक्क आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्युपत्र लिहिण्याआधीच मृत्यू झाला असेल, तर त्याच्या संपत्तीवर मृत व्यक्तीच्या भावाच्या मुलांऐवजी त्याच्या सख्ख्या मुलीचा हक्क अधिक आहे.

संपत्तीच्या वाटणीमध्ये आजवर अनेक वेळा मोठमोठे वाद झालेले आहेत. भावा – भावांमध्ये तर सर्वाधिक वाद यात झालेले दिसून येतात. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने खूप फरक पडणार आहे.

तामिळनाडू येथील एका खटल्यावर निर्णय देतांना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे संपत्तीबाबत महत्वपूर्ण स्पष्टीकरण मिळाले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here