नाशिक प्रतिनिधी ; जिल्ह्यातील होऊ घातलेल्या 17 बाजार समितीच्या निवडणुका रद्द केल्या आहेत. यामुळे घुडघ्याला बाशिंग लावून बसलेल्या नेत्यांचा हिरमोड झाला आहे. न्यायालयाने आधी सहकारी सोसायटींच्या निवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यातील 17 बाजार समितींचा निवडणूक कार्यक्रम सहकारी प्राधिकरणाने रद्द केला आहे. प्रारूप मतदार यादी जाहीर करणे व हरकती मागवणे यावर हरकती मागवणे देखील पुढे ढकलले आहे. अनेक नेत्यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपल्या भेटीगाठी सुरू केल्या होत्या. मात्र याला न्यायालयाच्या निर्णयामुळे धक्का बसला आहे.
बाजार समितीत सोसायटी गट महत्त्वाचे असून अनेक सोसायटीचे मतदान झालेले नसल्याने न्यायालयाने हा निवडणूक कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना केल्यात. या गटातील सदस्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले असते यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. असे न्यायालयाने म्हटले आहे, यात वकिलांनी दावे प्रतिदावे देखील केले मात्र, सहकारी सोसायटींच्या निवडणूक आधी घेण्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम