बाजारात तुरीची आवक उंचीवर , तुरीच्या दरात देखील वाढ

0
20

शेतीमालाच्या दरावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आवक होत असलेल्या सोयाबीन, तूर आणि हरभऱ्याचे दर हे स्थिरावले होते. 20 एप्रिलला अमरावती बाजारात तुरीची 6410 क्विंटल आवक होती. आवक मालाला किमान 6200 तर कमाल 6300 रुपयांचा दर मिळाला. सर्वसाधारण दर 6250 चा असून अमरावती बाजारात तुरीची आवक वाढली होती. शेतकऱ्यांचा उत्साह दुणावला आहे.

तर दर पातळी स्थिर होती. तर उदगीर बाजारात तुरीची 1350 क्विंटल आवक झाली. आवक मालाला किमान 5700 तर कमाल 6299 रुपयांचा दर मिळालाय. तसंच सर्वसाधारण दर 5999 चा होता.बाजारात तुरीची आवक वाढली होती. तर किमान दर काहीसे घटले होते. तर भोकर बाजारात तुरीची 119 क्विंटल आवक झाली. तर कारंजा बाजारात तुरीला 5500 ते 6300 रुपयांचा भाव देण्यात आला. अकोला येथे 1918 क्विंटल आवक झाली होती.

यंदाच्या हंगामात सोयाबीनच्या दरात कायम चढ-उतार झालेला आहे. शिवाय आता उन्हाळी सोयाबीन बाजारात दाखल झाल्यावर या मालाचा सर्वसाधारण भाव 5950 रुपये होता. शेतकऱ्याने हात पकडता घेऊन आता तुरीची साठवणूक करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी तुरीला सर्वसाधारण 6000 रुपये दर मिळाला. तर किमान दर 5500 ते 6295 रुपये दर मिळाला.

 

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here