बागलाण रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर ; मा.आ.चव्हाण उपोषणावर ठाम

0
82

– तुषार रौदळ
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; बागलाण तालुक्यातील रस्त्यांची गेल्या काही महिन्यांपासून अतिशय दुरावस्था झाली असुन या रस्त्यावरुन प्रवास करतांना सर्वसामान्य नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

यामुळें सर्वसामान्य नागरीकांमध्ये प्रशासन व लोकप्रतिनिधीबद्दल संतापाची भावना असुन, सार्वजनीक बांधकाम विभाग व निष्क्रीय लोकप्रतिनिधीचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

त्यामुळे येत्या गुरुवार पासुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व सहकारी बागलाण तहसिल कार्यालयासमोर अन्नत्याग व उपोषणास बसणार आहेत या आशयाचे निवेदन तहसिलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना माजी आमदार संजय चव्हाण यांनी दिले आहे.

बागलाण तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. रस्त्यावरुन प्रवास करतांना सर्वसामान्य नागरीकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

रस्त्यांची हि अवस्था बघुन सर्वसामान्य नागरीक हवादिल झाले असुन सर्वसामान्य नागरीकांच्या मनात प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याबद्दल तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.

बागलाण तालुका हा राज्यभरात शेती व्यवसायात अग्रगण्य तालुका म्हणून परिचित आहे. द्राक्ष, डाळिंब, कांदा, मका, सोयाबिन या पिकांचे उत्पादन तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. बागलाण हा शेजारील गुजरात राज्याला जोडणारा तालुका आहे.

तालुक्यातून दररोज मोठ्या प्रमाणात भाजीपाल्यासह दुध व इतर शेतीमालाची शेजारील गुजरात राज्यात आवक जावक होत असते. तसेच कारखानदारी व कंपन्यासाठी लागणारा कच्च्या मालाबरोबरच अवजड वाहतुक हि तालुक्यातुन होते.

परंतु तालुक्यातील प्रमुख रस्ते व गावांना जोडणारे सर्व रस्त्यांची दुरावस्था झाली असल्याने याचा परिणाम शेतमालाच्या वाहतुकीवर होत आहे. त्यामुळें वाहतुकीसाठी जादा वेळ व ज्यादा खर्च होत असल्याने शेतकरीवर्ग त्रस्त झाला आहे.

नाशिक शहर हे राज्यातील सुवर्ण त्रिकोणातील शहर असल्याने, नाशिक पुणे मुंबई येथे बागलाण तालुक्यातील जनतेला शासकिय कामे, नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध, मुलांचे शिक्षण अशा विविध कारणास्तव नेहमी ये जा करावी लागते.

मात्र रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे वाहन चालक व प्रवाश्यांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे.

रस्ते हे विकासाचे मार्ग असुन ग्रामिण भागाच्या विकासाच्या रक्तवाहिन्या असतात मात्र जनतेच्या अशा जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे बागलाण तालुक्यातील निष्क्रिय लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष हि खेदाचि बाब आहे.

ठेकेदाराशी असलेल्या आर्थिक व्यवहारांमुळे जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. त्यामुळें तालुक्यातील जनतेमध्ये लोकप्रतिनिधीबद्दल संतापाची भावना आहे.

त्यामुळें तालुक्यातील रस्त्यांच्या या दुरावस्थेला जबाबदार असलेल्या सार्वजनीक बांधकाम विभाग व निष्क्रीय लोकप्रतिनिधीचे या प्रश्नांकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळें येत्या गुरुवार २/१२/२१पासुन मी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिक आणि सहकारी तहसिल कार्यालयासमोर अन्नत्याग करुन उपोषणास बसणार आहोत असेहि निवेदनातून सांगण्यात आले आहे.

या रस्त्यांची झाली दुरावस्था..
सटाणा -ताहराबाद-पिंपळणेर, सटाणा, नामपुर, नामपुर- साक्री, नामपुर- अंबासण -मालेगाव, सटाणा-देवळा-सोग्रस, सटाणा-मालेगाव

याबरोबरच बागलाण तालुक्यातील विविध गावांना जोडलेल्या अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनाचे तर नुकसान होतेच पण प्रवाशांना कंबर व मणके दुखीच्या मोठ्या आजारांनी घेरले असुन त्यांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

खराब रस्त्यामुळे अनेकांना आपल्या प्राणांना मुकावे लागले. तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनामुळे सर्वसामान्य जनतेवर हि वेळ आली असून हि अतिशय निंदणीय व खेदजनक बाब आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here