बजेट स्पेशल : आजअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत बजेट सादर केला. यादरम्यान निर्मला सीतारामन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. जाणकारांचे म्हणणे आहे की हा शिलकीचा अर्थसंकल्प आहे. मात्र, संपूर्ण अर्थसंकल्पात नोकरदार वर्ग डोळ्यासमोर ठेवून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर काही गोष्टी स्वस्त होतील तर काही महाग होणार आहे.
आज सादर झालेल्या सार्वत्रिक अर्थसंकल्पानंतर तुम्हाला कोणत्या वस्तुंसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतील, तसेच, आता कोणत्या गोष्टींमुळे तुमचे पैसे वाचतील ते जाणून घेवूयात. अर्थमंत्र्यांनी अनेक गोष्टींवरील कस्टम ड्युटी, आयात शुल्क सह सर्व शुल्क वाढवण्याबद्दल व कमी करण्याबद्दल भाष्य केले आहे.
हे झाले स्वस्त…
• मोबाईल चार्जर स्वस्त होईल
• हिर्याचे दागिने स्वस्त होतील
• शूज आणि चप्पल स्वस्त होतील
• परदेशातून येणार्या मशिन्स स्वस्त होतील
• मोबाईल ,कापड,लेदर
हे झाले महाग…
कॅपिटल गुड्सवर आयात शुल्कातील सूट काढून टाकत 7.5 टक्के आयात शुल्क लावण्यात आले आहे.
इमिटेशन ज्वेलरीवरील कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे. जेणेकरून त्याची आयात कमी करता येईल.
तसेच परदेशी छत्रीही महागणार आहे.
एमएसएमईना मदत करण्यासाठी, अर्थमंत्र्यांनी स्टील स्क्रॅपवरील कस्टम ड्युटी सूट एका वर्षासाठी वाढवण्याची घोषणा केली आहे.
मेंथा ऑईलवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम