नवी दिल्ली : मोदी सरकारच दुसऱ्या कार्यकाळातील चौथा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी लोकसभेत सादर करण्यास सुरुवात केली असून अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री उपस्थित होते.
संसदेत २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन सांगितले की, डिजिटल अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. देशाचा विकास दर ९.२७ टक्के असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. असून पुढील पाच वर्षात ६० लाख नवे रोजगार निर्मिती केली जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्ती गमावल्या त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त करून अर्थसंकल्पाला सुरुवात केली. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्त्सव साजरा करत आहोत. हा अर्थसंकल्प पुढील २५ वर्षाचा पाया घालणार ठरेल असे गौरवोद्गार काढत देशाच्या ७५ ते १०० वर्षाचा ब्लू प्रिंट सादर करत असल्याचे त्या म्हणाल्या.
करोना आणि महागाई या संकटातून देशातील सर्व सामान्य जनतेला यावेळीच्या अर्थसंकल्पातून मोठ्या आशा आहेत. त्यांना केंद्रीय अर्थमंत्री कोणता दिलासा देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. इनकम टॅक्स स्लॅबमध्ये किती बदल केला जातो याकडे सर्वांची लक्ष्य असेल. त्याच बरोबर अर्थसंकल्पानंतर पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीला डोळ्या समोर ठेवून सरकार कोणते निर्णय घेते हे देखील पाहावे लागणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम