द पॉईंट नाऊ : सध्या शेअर बाजारात तुफान चढउतार असून बजेटपूर्वी मजबूत कमाई करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये चांगले शेअर्स समाविष्ट करायचे असतील, तर तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्याने खरेदी करू शकता. शेअर बाजार तज्ज्ञांनी तुमच्यासाठी 3 मजबूत स्टॉक्स सांगितले आहेत व 1 वर्षासाठी पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला आहे.
या शेअर्स मध्ये झेन टेक्नॉलॉजीज (Zen Technologies)शेअर बाजार तज्ज्ञ आणि सेठी फिनमार्टच्या विकास सेठी यांनी आपल्या बजेट पिकमध्ये झेन टेक्नॉलॉजीजचा (Zen Technologies) समावेश केला आहे. तर विकास सेठी यांनी झेन टेक्नॉलॉजीजमध्ये पुढील एक वर्षासाठी पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकसाठी 325 रुपयांचे टारगेट देण्यात आले असून. कंपनीची ऑर्डर बुकही जवळपास 425 कोटींची झाली आहे.काही काळात या कंपनीसाठी चांगली संधी असल्याचा विश्वास सेठी यांना आहे.
तर शारदा क्रॉपकेम (Sharda Cropchem)शेअर बाजार तज्ज्ञ सिद्धार्थ सेदानी यांनी शारदा क्रॉपकेममध्ये (Sharda Cropchem) खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या याचे मूल्यांकन अर्थात व्हॅल्युएशन स्वस्त आहे आणि बजेटसाठी हा एक चांगला स्टॉक आहे. त्यांनी पुढील एक वर्षासाठी स्टॉकवर 480 रुपयांचे टारगेट दिले आहे. कंपनीची प्रोडक्ट लाइन-अप खूप मजबूत आहे. यासोबतच कंपनीचे डिस्ट्रिब्यूशन नेटवर्कही खूप मजबूत आहे.
अपोलो हॉस्पिटल (Apollo Hospitals)मार्केट एक्सपर्ट सिद्धार्थ खेमका यांनी त्यांच्या बजेट पिकमध्ये अपोलो हॉस्पिटल्सचा समावेश केला आहे. येत्या अर्थसंकल्पात सरकारचे लक्ष हेल्थकेअर क्षेत्रावर असेल. बजेटसाठी हा सर्वोत्तम स्टॉक आहे. त्यांनी पुढील एक वर्षासाठी 5,900 रुपयांचे टारगेट या शेअरसाठी दिले आहे.नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सूचना- खरेदी पूर्वी बाजाराचा अंदाज घेऊन निर्णय घ्यावा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम