बंडा तात्यांच्या वक्तव्या विरोधात देवळा राष्ट्रवादीच्या रणरागिणी मैदानात

0
10
प्रसिद्ध कीर्तनकार बंडातात्या कराडकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा,या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांना देतांना तालुका अध्यक्षा उषाताई बच्छाव, वनिता शिंदे ,दिलीप आहेर, संतोष शिंदे आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा प्रतिनिधी : प्रसिद्ध कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज देवळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात येऊन ,गुन्हा दाखल करण्यात यावा ,या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांना देण्यात आले .

प्रसिद्ध कीर्तनकार बंडातात्या कराडकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावाया मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांना देतांना तालुका अध्यक्षा उषाताई बच्छाव वनिता शिंदे दिलीप आहेर संतोष शिंदे आदी छाया सोमनाथ जगताप

महाविकास आघाडी सरकारच्या वाइन विक्रीधोरणाविरोधात बोलताना त्यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. या वक्तव्यानंतर सर्वपक्षीय महिला नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला व प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे.

सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रसिद्ध कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना चांगलंच महागात पडणार असं दिसतंय. राज्य महिला आयोगाने या वक्तव्याची गंभीर दखल घेतली असून महिलांबाबतचं अशा प्रकारचं वक्तव्य खपवून घेणार नाही असा इशारा दिला होता. तसंच सातारा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करून यासंदर्भातला अहवाल दोन दिवसात सादर करावा, असा आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काल दिला होता. त्यानुसार आज सकाळीच बंडातात्या कराडकर यांच्या मठात साताऱ्याचे पोलीस पोहोचल्याची माहिती हाती आली आहे. दरम्यान, बंडातात्या कराडकरां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

आता पोलीस बंडातात्यांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावेळी तालुका अध्यक्षा उषाताई बच्छाव ,शहर अध्यक्षा वनिता शिंदे , शहर प्रमुख दिलीप आहेर, युवक शहर अध्यक्ष तथा नगरसेवक संतोष शिंदे आदी उपस्थित होते .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here