देवळा प्रतिनिधी : श्रीक्षेत्र गोरक्षनाथ मळा , मकरंदवाडी ता देवळा येथे धर्मनाथ बीज महोत्सवाचा उद्या शुक्रवारी (दि ४) रोजी ह भ प बंडातात्या महाराज कराडकर यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता समारंभ संपन्न होणार आहे .
याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्रंबकेश्वरचे माजी अध्यक्ष ह भ प संजय नाना धोंडगे यांनी केले आहे . श्रीक्षेत्र गोरक्षनाथ मळा , मकरंदवाडी ता देवळा येथे धर्मनाथ बीज महोत्सवाचा( दि ३१) जानेवारी पासून प्रारंभ झाला .
या महोत्सवात ह भ प जयंत महाराज गोसावी, त्रंबकेश्वर ,ह भ प उल्हास महाराज सूर्यवंशी ,आळंदी ,ह भ प राम महाराज ,शेगांव ,ह भ प ज्ञानेश्वर महाराज ,पंढरपूर यांची कीर्तन सेवा झाली . या महोत्सवाचा शुक्रवारी (दि ४) रोजी सकाळी १० ते१२ ह भ प बंडातात्या महाराज कराडकर यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता समारंभ होणार आहे . याचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ह भ प संजय नाना धोंडगे यांनी केले आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम