सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुका ऊस बागायतदारांचा तालुका म्हणून ओळखला जातो. ऊस कारखान्याला जाण्यास सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागत असल्याने तालुक्यातील शेतकरी इतर पिकांच्या उत्पादनाकडे वळू लागला आहे. सफरचंदाच्या शेतीची पंढरपूर तालुक्यात सध्या जोरदार चर्चा आहे.
देगाव ता. पंढरपूर येथील शेतकरी धनंजय शेळके या तरुण शेतकऱ्यांने सहकारी बँकेतील चांगी नोकरी सोडत सफरचंदाची बाग शेतात फुलवण्याचा विक्रम केला आहे. त्यांच्या या कष्टातून बागेतील झाडांना सफरचंदाची चांगल्या प्रकारची फळे आली आहे. त्यांने आपल्या शेतात सफरचंदाच्या चार वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची लागवड केली असून त्याची बाग सध्या दीड वर्षांची असून सुस्थितीत आहे.
या सफरचंदाच्या शेतीतून सफरचंद पिकवून त्यांना भविष्यात स्वतःच्या सफरचंदाचा ब्रँड तयार करायचा आहे. असा त्यांनी व्यक्त केलं सफारचंदाच्या बागेत आंतरपिके घेतली. याचा फायदा सफरचंदाच्या झाडांच्या वाढीसाठी झाल्याचे शेळके यांनी सांगितले. त्यांच्या या आजूबाजूचे शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले.शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पन्न कसे वाढेल याचा शोध सुरू असताना फेसबुकवर सफरचंदाच्या शेतीची माहिती मिळाली. त्यामध्ये उष्णकटिबंधीय वातावरणात येणाऱ्या सफरचंदाची माहिती दिली होती.
माहितीच्या आधारे सफरचंदाच्या इतर वाणाची माहिती गुगलवरून घेण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या शेतातील मातीत कोणत्या सफरचंदाची झाडे चांगल्या प्रकारे येऊ शकतात याचा शोध त्यांनी घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्यांना सफरचंदाच्या विविध जातीची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी शेतात सफरचंदाच्या चार व्हरायटीच्या रोपांची लागवड करण्याचा निर्णय घेतला व त्यांनी तशी रोपी मागवली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम