मुंबई प्रतिनिधी : बॉलीवूडमध्ये आजवर अनेकाच्या आयुष्यावर आधारित चित्रपट बायोपिक प्रेक्षकाच्या भेटीस आल्या. विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींचे प्रेरणादायी आयुष्य मोठ्या पडद्यावर मांडण्यात आले अशीच एक कथा आता चित्रपटाच्या रुपात प्रदर्शित होणार आहे. ही कथा आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांची. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आनंद महादेवनयांनी त्यांच्या ‘फुले’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
आज महात्मा फुले यांची १९५ वी जयंती आहे याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात महात्मा फुलेंची भूमिका अभिनेता प्रतिक गांधी तर सावित्रीबाईंची भूमिका अभिनेत्री पत्रलेखा साकारणार आहे. अनंत महादेवन यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. महात्मा फुलेंवर आधारीत हा हिंदी बायोपिक २०२३ मध्ये रिलीज होणार आहे. दिग्दर्शक आनंद महादेवन यांनी या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेयर केलं आहे. अभिनेता प्रतीक गांधी याने देखील या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.
फुले हा माझ्या करिअरमधील पहिला बायोपिक आहे. त्यांच्यासारखं प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व मोठ्या पडद्यावर साकारण हे माझ्यासाठी खूप मोठे आव्हान आहे. हे माझ ड्रीमरोल असून त्याच्या शूटिंगसाठी मी खूप उत्सुक आहे. “काही भूमिका या तुमच्याकडे सहज येतात आणि या भूमिकेसाठी माझ्याकडे आल्याबद्दल मी अनंत सरांचे आभार मानतो” असे प्रतीक म्हणाला. भारताचे पहिले महात्मा आणि सामाजिक क्रांती घडवणारे भारतातील पहिले जोडपे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या समाजकार्याला सिनेमॅटिक व्हिजन देणं हा माझा सम्नान आहे असं ट्विट दिग्दर्शक आनंद महादेवन केलं आहे.
या चित्रपटातील अभिनेत्री पत्रलेखा म्हणाली, “माझं संगोपन मेघालयातील शिलाँगमध्ये झालं आहे. हे असे राज्य आहे जिथे पुरुषांपेक्षा महिलांचे अधिकार आणि निर्णयांना अधिक महत्त्व दिले जाते. अशा परिस्थितीत स्त्री – पुरुष समानतेची गरज आहे. या विषयाला माझ्या हृदयात खूप महत्त्वाचे स्थान आहे. सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे पती ज्योतिबा फुले यांच्या सहकार्याने 1848 मध्ये मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सुरु केली. महात्मा फुले यांनी विधवांचे पुनर्विवाह करण्यासाठी आणि गर्भपातावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनाथाश्रमाची स्थापना केली. हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. अनंत महादेवन यांनी याआधी ‘मी सिंधुताई सपकाळ’, ‘गौर हरी दास्तान’ आणि ‘बिटरस्वीट’ यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. राज किशोर खावरे, प्रणय चोक्शी, सौरभ वर्मा, उत्पल आचार्य, अनुया कुडेचा आणि रितेश कुडेचा निर्मित ‘फुले’ हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम