नितीन फंगाळ
चांदवड प्रतिनिधी : भारताचे पहिले सरसेनाध्यक्ष, अतुलनीय धैर्य, परिश्रमी, देशाच्या सशस्त्र दलांच्या एकत्रिकरणाची योजनांची आखणी व सुरक्षा यंत्रणांच्या आधुनिकरणातील मोठे योगदान देणारे भारताचे शूरवीर ,देशभक्त, उत्कृष्ट नेतृत्व गुण असणारे सैनिक जनरल बिपीन रावत यांचा आपल्या पत्नीसह अन्य अकरा सेना सहकाऱ्या सोबत कुंनूर(तमिळनाडू) येथे हवाई दलाच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला.

चार दशकांच्या देशसेवेत अतुलनीय कार्य करणाऱ्या या देशभक्तास व अन्य सेनेच्या सहकाऱ्यांच्या मृत्यू मुळे देशाच्या सेनादलांवर मोठा आघात झाला आहे.
अखंड देशसेवेचे व्रत घेणाऱ्या या देशभक्तास व अपघातात मृत्यमुखी पडलेल्या अन्य सर्व सेनेच्या सहकार्यांना रंगीत खडू माध्यमातून केलेल्या फलक रेखाटनातून ‘अखेरचा सॅल्युट’ व भावपूर्ण श्रद्धांजली…!
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम