प्रात्यक्षिक प्रशासनाचे ; स्थलांतर नागरिकांचे, ‘घोड्याची आडी’ रातोरात निर्मनुष्य

0
65

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : देवळा तालुक्यातील वार्षी ग्रामपंचायत अंतर्गत येणारी वस्ती धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली ‘घोड्याची आडी’ याठिकाणी काल प्रशासनाने भेट देऊन कोकणात ज्या घटना घडल्या त्या पार्श्वभूमीवर घटना घडल्यावर प्रशासन किती तत्पर आहे याचे प्रात्यक्षिक घेतले. मात्र हे प्रात्यक्षिक घेतांना स्थानिक नागरिकांना पूर्वकल्पना दिली नसल्याने नागरिक भीती पोटी रातोरात स्थलांतर झालेत, हलगर्जी प्रशासनामुळे सर्वसामान्यांची रात्र मात्र भीतीपोटी जीवमुठीत धरून गेली

देवळा तालुक्यात डेंजर झोनमध्ये असलेली वस्तीवर तहसीलविभाग, आरोग्य विभाग,आपत्ती विभाग या सर्व विभागांना कॉल करून कोणते डिपार्टमेंट किती वेळात घटना स्थळी पोहचते याचे प्रात्यक्षिक काल घेण्यात आले. मात्र या प्रत्यक्षिकाने वस्तीवरील आदिवासींची झोप उडाली. अनेक नागरिकांनी रातोरात आपल्या नातलगांकडे पलायन केले. तसेच काहींनी गावात इतरांकडे आश्रय घेतला.

वस्तीची जागा बदलणे गरचेचे अधिकाऱ्यांची आपसात चर्चा

घोड्याची आडी ही वस्ती धोकादायक ठिकाणी असून तिला हलवण्याचा सूचना प्रशासनाने सरपंचांना दिल्या. लवकरच ही वस्ती नवीन जागेत हलवण्यात यावी यासाठी पर्यायी जागा शोधा असे निर्देश दिले , ही चर्चा स्थानिक नागरिकांच्या कानावर पडली अन तिचा विपर्यास झाला. स्थानिकांना वाटलं की येत्या 10-15 दिवसात ढगफुटी होऊ शकते यामुळे अनेकांनी धास्ती घेतली.

अफवांना चेव ; दरड कोसळणार ढग फुटी होणार

घोड्याची आडी हनुमंतपाडा या ठिकाणी दरड कोसळणार तसेच मोठ्याप्रमाणात दुर्घटना होऊ शकते अशी चर्चा वाऱ्यासारखी पसरली व लोकांची तारांबळ उडाली. तसेच लोकांनी आपले स्थलांतर करायला सुरुवात केली.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here