प्रलंबित मानधन लवकर अदा करा ; सेना महिला आघाडीची मागणी

0
39

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; उमेद बचत गटातील प्रेरिका बैंकसखी , पशुसखि ,कृषीसखी वर्धिनि यांचे प्रलंबित मानधन लवकरात लवकर अदा करण्यात यावे ,या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी चांदवडचे गटविकास अधिकारी महेश पाटील यांना देण्यात आले .

बचत गटातील उमेद प्रेरीकाना प्रलंबित मानधन मिळावे यासाठी शिवसेना चांदवड तालुका महिला आघाडीच्या वतीने .गटविकास अधिकारी महेश पाटील साहेब यांना निवेदन देताना अर्चना पुरकर ,रोशनी कुंभार्डे, ज्योती थोरात आदी (छाया – सोमनाथ जगताप )

शासनाने महिलांचे सबलीकरण व्हावे यासाठी गावोगावी स्थापन करण्यात आलेल्या महिला बचत गटांना उमेदच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येत आहे. याकामी तोडक्या मानधनावर महिला काम करीत आहेत. मात्र ,या महिलांना वेळेवर मानधन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याची दखल घेऊन त्यांना तात्काळ आपल्या कामाचा मोबदला मिळावा ,अशी मागणी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितिन आहेर ,चांदवड तालुका प्रमुख विलास भवर,महीला आघाडीच्या उपजिल्हा संघटक अर्चना ताई पुरकर ,चांदवड तालुका संघटक रोशनी ताई कुंभार्डे, देवळा तालुका संघटक ज्योती ताई थोरात शहर संघटक रोहिणी वाघ, युवतीसेना उपतालुका प्रमुख ममता बागूल आदींसह बचतगटातील महिला उपस्थित होते .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here