नाशिक प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी प्रदेश माध्यम विभागातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत वैभव अलई यांचा निबंध सर्वोत्कृष्ट ठरला आहे.
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण कार्यक्रम होणार असून, त्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही श्री. भांडारी यांनी पत्रकात नमूद केले आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक – वैभव अनिल अलई, (नाशिक), द्वितीय क्रमांक वर्षा आबासाहेब अहिरराव, (जळगाव) तृतीय क्रमांक (विभागून ) मानसी मंगेश सावर्डेकर (ठाणे) आणि प्रज्ञा दर्भे, (बोरिवली).
प्रतिभा पोतदार, सुनील नातू, महेंद्र गेल्ये, कविता अरुण हिरे, आकाश गोवरे, मोहन अत्रे, शैलजा मधुकर रानडे, सागर आव्हारे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली आहेत, अशी माहितीही श्री. भांडारी यांनी दिली आहे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम