पोस्ट मास्तरने वीसहुन अधिक कुटुंबांना लावले देशो-धडीला; लोकांचे एफ.डी. चे जमा झालेले 1 कोटी रुपये आयपीएल सट्टेबाजीवर उडवले

0
32

द पॉईंट नाऊ ब्युरो : सट्टा ही बाब चांगल्या चांगल्यांना देशो-धडीला लावते. आता एका पोस्ट मास्तरने याच्या आहारी जाऊन वीसहुन अधिक कुटुंबांचे एफ.डी. चे 1 कोटींहून अधिकची रक्कम गमावली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मध्य प्रदेशात बिना सब ऑफिसच्या एका पोस्ट मास्तरने आयपीएल वर सट्टा लावून सुमारे 1 कोटी रुपये उडवले असल्याचा आरोप या कुटुंबांनी केला आहे. विशाल अहिरवार असे या पोस्ट मास्तरचे नाव आहे. हा पोस्ट मास्तर गेल्या दोन वर्षांपासून आयपीएल मध्ये सट्टेबाजी साठी हे पैसे वापरत होता. त्याने बनावट एफ. डी. खात्यांसाठी खरे पासबुक जारी केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सदर पोस्ट मास्तरला अटक करण्यात आली आहे.

सट्टा ही अशी बाब आहे, की जी अनेकांना बरबाद करते. आणि आता इथे तर एका महाभागाने सट्टा लावून वीसहुन अधिक कुटुंबांनाच एक प्रकारे देशो धडीला लावले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here