नवी दिल्ली : देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा मागील आठवड्यात पूर्वोत्तर राज्यांच्या दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. तेथील सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर दोनच दिवसांत आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांमधील वाद चिघळला आहे. दोन्ही राज्यांच्या सीमेवर हिंसाचार सुरू असून फायरींग झाल्याचीही माहिती समोर आली आहे. सरकारी वाहनांवरही हल्ला झाल्याचं समोर आले आहे. त्यानंतर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून एकमेकांबद्दल तक्रार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहांना टॅग केले. विशेष म्हणजे दोन्ही राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे.
या हिंसाचारात आसाम व मिझोराम सीमेवर झालेला गोळीबार व दगडफेकीमध्ये आसाम पोलिस दलातील सहा जणांचा मृत्यू झाला. तर महाराष्ट्रचे भूमिपुत्र पोलिस अधिक्षक वैभव निंबाळकर यांच्यासह सुमारे 50 पोलिस जखमी झाल्याने खळबळ उडाली आहे. निंबाळकर हे मुळचे बारामतीचे असून आसाम केडरचे अधिकारी आहेत. ते दोन महिन्यापूर्वीच काचारच्या पोलिस अधिक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला व लगेचच हा हिंसाचार अतिशय दुर्दैवी असल्याने निषेध व्यक्त केला जातोय. निंबाळकर यांच्या पायाला गोळी लागल्याचे समजल्यावर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. आसामच्या मुख्यमंत्र्यांनीच ट्विटरवरून पोलिसांच्या मृत्यूबाबत माहिती दिली. या घटनेनंतर दोन्ही राज्यांच्या सीमेवरील तणाव वाढला आहे. सीमेवरील तणावात वाढ झाल्यानंतर निंबाळकर हे पोलिस कर्मचाऱ्यांसह बंदोबस्ताला होते. पण वाद चिघळत गेल्याने त्यांच्या दिशेने दगडफेक व गोळीबार सुरू झाला. यामध्ये सहा पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर निंबाळकर यांच्यासह 50 पोलिस जखणी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे समजते. मात्र या घटना अतिशय विचित्र असून सुरक्षा रक्षकच अस एकमेकांत भिडल्यावर सर्वसामान्यांनी कोणाकडे बघावं हा एक प्रश्नच आहे.
या घटनेनंतर देशाचे गृहमंत्री अमित शहा मागील आठवड्यात पूर्वोत्तर राज्यांच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर दोनच दिवसांत आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांमधील वाद चिघळला आहे. मिझोराममधील ऐजॉल, कोलाबिस आणि मामित तर आसाममधील कोचर, हेलकांडी आणि करीममंग या जिल्ह्यांच्या सीमा आहेत. या सीमेची लांबी 164.6 किमी एवढी आहे. मागील अनेक वर्षांपासून सीमाप्रश्नाचा मुद्दा असून त्यावरून सातत्याने हिंसा होते. दोन्ही राज्यांतील नागिरक अनेकदा एकमेकांना भिडतात. जून महिन्यातही अशीच घटना घडली होती. त्यामुळे या भागात लवकर केंद्राने हस्तक्षेप करून तोडगा काढावा अशी मागणी होतेय.
गृहमंत्री शहा हे दोन दिवसांपूर्वीच दौरा आटपून दिल्लीत परतले. त्यानंतर लगेचच दोन्ही राज्यांच्या सीमेवर तणाव वाढला ही देशासमोर चिंतेची बाब आहे. सोमवारी मिझोराममधील एका दाम्प्यत्यावर आसाममधील काही गुंडांनी हल्ला केल्याचे ट्विट मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी केलं होतं. त्यानंतर हा वाद आणखी वाढत गेला. दोन्ही बाजूने पोलिस व नागरिकांनी जोरदार दगडफेक केल्याचे वृत्त आहे. तसेच दोन्ही बाजूने गोळीबार झाल्याचेही सांगितले जात आहे.
सीमेजवळील जंगलात लपून बसलेल्या आसाममधील एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार सुरू आहे. काचारचे पोलिस अधिक्षक वैभव निंबाळकर यांच्यासह सुमारे 50 जण जखमी झाले आहेत.’ तर आसामचे मुख्यमत्री हिमंता बिस्व सरमा यांनी ट्विट करून सहा पोलिस कर्मचाऱ्यांचा या हिंसाचारात मृत्यू झाल्याची माहिती दिली. सीमेचे संरक्षण करताना सहा शुर पोलिसांनी बलिदान दिल्याचं सरमा यांनी म्हटलं आहे. या सर्व घडामोडी देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी चिंतेची बाब असून या घटना वाढू नयेत यासाठी केंद्राने पाऊल उचलणे गरजेचं आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम