देवळा प्रतिनिधी : देवळा नगपंचायत निवडणूक नंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून, वॉर्ड क्रमांक 4 च्या भाग्यश्री अतुल पवार यांच्या विजयानंतर अतुल पवार यांनी मार्मिक टोला लगावला होता यावर आक्षेप घेत अश्विनी आहेर या म्हणाल्या की उदयकुमारांना टोच मारणारा अजुनकोणी जन्माला आलेला नाही, आणि पोपटाने चोचीने पैसे ओतले म्हणून हा विजय आहे भाजपाचा विजय नैतिक नसून पैशाचा जोरावर आहे, त्यांनी मारलेल्या बोथट चोचने प्रामाणिक मतदार घायाळ झाला आहे, मतदानासाठी निवडणुकीत वारेमाप पैसा, दारू मटण याचा अतिरेक झाला. हिम्मत असेल तर बिगरपैशाची निवडणूक लढवून दाखवा. त्यामुळे चोच मारण्याच्या भाषा करू नका असा हल्ला अश्विनी आहेर यांनी केला आहे.
शिवसंग्रामच्या उमेदवार अश्विनी आहेर यांच्या सभेप्रसंगी उद्यकुमारांनी अतुल पवार हे केदा आहेर यांचा पोपट आहे असा उल्लेख केलेला त्यावरून निकालानंतर ‘द पॉईंट नाऊ’कडे अतुल पवारांनी सांगितले की पोपटाने चोच मारली अन विजयी झालो, या वाक्याला धरून आज ‘द पॉईंट नाऊ’ने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर अश्विनी आहेर ह्या चांगल्याच भडकल्या, त्यांना पैशाच्या विजयावर आत्मिक समाधान आहे का ? बिगर पैशाची निवडणूक लढवून दाखवा, अन विजयी व्हा तेव्हा आनंदोत्सव साजरा करा, असा सल्ला देखील आहेर यांनी दिला.
लोकांना बदलीच्या धमक्या दिल्या कोणाला नोकरीचे आमिष दिले , सत्ताधाऱ्यांनी कोणता विकास केला तो मांडावा त्यांचा विकास फक्त लोकांना व्यसनाला लावायचा इतकाच आहे, तरुणाईला वाम मार्गाला लावण्याचे काम त्यांनी केले, यापलीकडे काय विकास केला हे दाखवावे, असे आव्हान देखील सौ आहेर यांनी दिले.
ही निवडणूक अश्विनी आहेर विरुद्ध भाग्यश्री पवार अशीच होती, यात कुठेही उदयकुमार विरुद्ध अतुल पवार नव्हती तशी तुलनाच होऊ शकत नाही, माझ्या पराभवासाठी लाखो रुपये खर्च करावे लागले यातच तुमचा पराभव आहे. आनंदोत्सव साजरा करतांना जरा मनाला विचारा मग साजरा करा असे आहेर ह्या म्हणाल्या
उदयकुमारांनी राजकारणातून एग्झिट घेतली अश्विनी आहेरांनी नाही असे देखील त्यांनी ठणकावले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
Madam lachar janta ahe tyna swabhiman nahi ahe swabhiman rahila asta tar paise gheun apl bahumuly mast paisynsati vikal nast