भिकन शेख
पेठ प्रतिनिधी : तालुक्यातील म्हसगण शेजारील जांभुळपाडा येथे गॅस कनेक्शन तपासणी करणारे कारागीर यांचे कडून गॅस व्हॉल्व मधून गॅसची गळती होत असतांना चेक करणेसाठी माचीस काडी पेटवल्याने खोलीत पसरलेल्या गॅसने पेट घेतल्याने घरातील चार व्यक्ती भाजल्याची घटना घडली आहे .
दुखापतग्रस्थाना ग्रामीण रुग्णालय पेठ येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की म्हसगण शेजारील जांभूळपाडा येथे श्रीराम गॅस एजन्सीचे मांगीलाल बैष्णव नावाचे कारागीर गॅस कनेक्शन दुरुस्तीसाठी गेले असता सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या दरम्यान अलबाड यांचे घरी कनेक्शनची रबरी नळी बदलत असताना मोठ्या प्रमाणावर गॅस गळती झालेली होती त्यातच टेस्टिंग करताना काडी पेटवल्याने खोलीत पसरलेल्या गॅसने पेट घेतला.
दरम्यान, तुषार रमेश अलबाड वय ३१ वर्ष , ओकार गोपाळ खोटरे १३ वर्ष , डिम्पल खुशाल अलबाड वय २८ वर्ष , गोवर्धन परशराम भोये वय ४० सर्व राहाणार जांभूळपाडा यांचे गुडघ्यापर्यंत पाय भाजले . परिसरात वाहनाची सोय नसत्याने त्यांना मोटर सायकल वरुण उपचारासाठी पेठच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलीसानी सदर घटनेचा पंचनामा केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम